<em>भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे व जिल्हा सरचिटणीस शशिकांत इंगळे यांनी घेतली प्रांताधिकारी सौ .वैशाली राजमाने व कणकवली तहसीलदार रमेश पवार यांची भेट.</em>
कणकवली | प्रतिनिधी : प्रांताधिकरी सौ. वैशाली राजमाने व कणकवली तहसीलदार श्री .रमेश पवार यांची भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे व जिल्हा सरचिटणीस शशिकांत इंगळे,राजू इंगळे यांनी भेट घेऊन भटके विमुक्त जातीतील समाजाला अडथळा येणारा मूळ प्रश्न म्हणजे जात प्रमाणपत्र या विषयावर चर्चा करण्यात आली. भटक्या विमुक्त आघाडी मध्ये भटकंती करणारा समाज असल्यामुळे जातीच्या दाखल्यासाठी लागणारे आवश्यक ते कोणतेही पुरावे काही समाज बांधव यांचं आढळून येत नाही त्यामुळे जी कागदपत्र आहेत त्या आधारित जात प्रमाणपत्र देण्यात यावे अशी विनंती भटके विमुक्त आघाडीच्या वतीने करण्यात आली .
या समाजामध्ये जात प्रमाणपत्र नसल्यामुळे समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अडथळा होत आहे.जे शिकले त्यांना नोकरी मिळत नाहीत.या मुळे युवा पिढीचे फार मोठे नुकसान होत आहे त्यामुळे समाजाला जातीचा दाखले देण्यात यावे.यावर तहसीलदार पावर यांनी ज्यांना दाखला मिळता नाही अश्या लाभार्थ्यांचे असतील ते कागद पत्र गोळा करून त्यांचा एकत्रित डाटा गोळा करू.असे कोणी लाभार्थी जातीच्या दाखल्या पासून वंचित आहेत अश्यांचा समाजामध्ये सर्वे करा आणि जास्तीत जास्त कागदपत्र गोळा करण्याचा प्रयत्न करा एक दिवस आपण कॅम्प लावून समाजातील युवकांना जात प्रमाणपत्र देऊ असे सांगण्यात आले. प्रांत अधिकारी राजमाने यांच्या कडे हाचा विषय मांडल्या नंतर त्यांनी योग्य मार्गदर्शन करून लागेल ते सहकार्य आमच्या कडून मिळेल. यावेळी प्रांताधिकारी व तहसीलदार यांचे उपस्थित पदाधिकारी यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. येणाऱ्या काळात जिल्ह्यात भटके विमुक्त जाती जमाती साठी जात प्रमाणपत्र मिळवण्याकरता मोठा संघर्ष उभा करून समाजातील न्याय मिळवून देण्यासाठी सिंधुदूर्ग जिल्हा भाजप भटके विमुक्त आघाडी कटिबध्द आहे.असे उपस्थित पदाधिकारी यांनी सांगितले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)