ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
पालकांचा मुलांशी सुसंवाद हवा : सहा.पोलिस निरीक्षक भारत फार्णे.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

पालकांचा मुलांशी सुसंवाद हवा : सहा.पोलिस निरीक्षक भारत फार्णे.

प्रकाशन: 12 Aug 2022 11:01 AM
वाचन संख्या 91

मुटाट प्रशालेत शिक्षक पालक संघाच्या सभेत प्रतिपादन..!

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
मुले घडवत असताना पालकांनी त्यांच्याशी संवाद नियमितपणे साधणे आवश्यक असल्याचे मत विजयदुर्ग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फार्णे यांनी व्यक्त केले .
मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या डॉ.श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल व कै. सौ. जानकी शिवराम राणे कनिष्ठ महाविद्यालयाच्या पहिल्या पालक-शिक्षक संघाच्या बैठकीच्या वेळी प्रमुख पाहुणे भारत फार्णे यांचा शाल ,श्रीफळ देऊन सभेचे अध्यक्ष शिवाजीराव राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संस्थेला साठ वर्षे नुकतीच पूर्ण झाल्याच्या निमित्ताने स्मृतिचिन्ह देऊन सुभाषचंद्र परांजपे यांनी पाहुण्यांचा सन्मान केला.
याप्रसंगी श्री भारत फार्णे यांनी सध्या मुले मोबाईलच्या आहारी जात असून त्यांच्या करिअरची दिशा योग्य होण्याकरता पालकांनी प्रसंगी कठोर होऊन संवादाच्या माध्यमातून मुलांवर योग्य ते संस्कार करावेत असे आवाहन केले. पोक्सो कायदा, सायबर गुन्हेगारी ,वाहतूक नियमांचे पालन करण्याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले.
पालक-शिक्षक संघाच्या नूतन कार्यकारिणीने उपाध्यक्ष म्हणून समीर मुल्ला, वाघोटण यांची निवड केली. सभेस चांगली उपस्थिती होती. यावेळी बस धारक मुलांच्या समस्या ,विद्यार्थी प्रगतीबद्दल सकारात्मक चर्चा झाली. सभेच्या निमित्ताने संवादाचा कार्यक्रम उपयुक्त ठरला.
याप्रसंगी मुटाट च्या सरपंचा सौ. मानसी पुजारे, संस्था पदाधिकारी रघुनाथ पाळेकर, भास्कर पाळेकर, सुरेश चिरपुटकर, विठोबा प्रभू ,दिलीप जोशी ,बाबाजी जोशी, शकील मुल्ला, अमोल पाळेकर,सूर्यकांत साळुंखे, मुख्याध्यापक श्री घरपणकर,पोलीस श्री. गलोले श्री कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री घुगे सर यांनी केले .आभार चेतन पाळेकर यांनी व्यक्त करून सभेची सांगता झाली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स