ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कणकवली पोलीस निरीक्षकपदी विजय यादव यांची नियुक्ती

कणकवली पोलीस निरीक्षकपदी विजय यादव यांची नियुक्ती

प्रकाशन: 27 Aug 2021 12:47 PM
वाचन संख्या 133

कणकवली / उमेश परब : कणकवली पोलीस ठाणे प्रभारीपदी पोलीस निरीक्षक विजय यादव यांची नियुक्ती पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी केली आहे. २४ ऑगस्टपासून विजय यादव यांनी कणकवली पोलीस निरीक्षकपदाचा कार्यभार सांभाळला आहे. राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेआधी मावळते पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला यांची तब्बेत खालावली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे पीआय मुल्ला हे रजेवर गेल्यामुळे त्यांच्या जागी तात्काळ विजय यादव यांची कणकवली पोलीस ठाणे प्रभारीपदी बदली करण्यात आली असून २४ ऑगस्टपासून पोलीस निरीक्षक यादव यांनी पदभार स्वीकारला आहे. पोलीस निरीक्षक यादव याना तब्बल ३८ वर्षांचा पोलीस दलातील अनुभव असून त्यांनी पोलीस दलात विविध ठिकाणी सेवा बजावली आहे. १९८३ साली सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलात भरती झालेल्या विजय यादव यांना खात्यांतर्गत २००० साली पोलीस उपनिरीक्षकपदी बढती मिळाली. त्यानंतर यादव यांनी बांदा पोलीस स्टेशन, मालवण पोलीस स्टेशन, लोहमार्ग मुंबई कुर्ला पोलीस स्टेशन, पोलीस आयुक्त नवी मुंबई येथे सेवा बजावली आहे. तळकोकणात हातखंबा येथे नॅशनल हायवे पोलीस केंद्र निर्मितीनंतर एपीआय असताना विजय यादव यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग हायवे टॅब ची जबाबदारी कुशलतेने सांभाळली होती. त्यांनतर सीआयडी क्राईम पुणे सिंधुदुर्ग युनिट मध्ये पीआयपदी सेवा बजावली. पोलीस निरीक्षक पदी असतानाच यादव यांनी पोलीस आयुक्तालय अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये सेवा बजावली आहे. पोलीस दलात कर्तव्यदक्ष आणि दिर्घअनुभवी पोलीस अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक विजय यादव यांची ख्याती आहे. कणकवली तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी समाजातील सर्व घटकांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचे यादव यांनी सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स