आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच रुडी कर्टझन यांचे कार अपघातात निधन...!
क्रिडा | सुयोग पंडित : आज दक्षिण आफ्रिकेतून समस्त क्रिकेटविश्वासाठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. क्रिकेटविश्वातील यशस्वी आणि अचूक पंचांपैकी एक असलेले दक्षिण आफ्रिकी पंच रूडी कर्टझन यांचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. रुडी कर्टजन ७३ वर्षांचे होते.
दक्षिण आफ्रिकेतील रिव्हर्सडेल येथे मंगळवारी सकाळी त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला असे समजत असून या भीषण अपघातात त्यांच्यासह आणखी ३ जण मृत्यूमुखी पडले आहेत. दक्षिण आफ्रिकेतील एका स्थानिक वृत्तपत्राच्या अहवालात त्यांच्या मृत्यूबद्दल सांगितले गेले आहे.
दक्षिण आफ्रिकन वृत्त सूत्रांनुसार रुडी कर्टझन गोल्फ खेळण्यासाठी गेले होते. गोल्फ खेळून झाल्यानंतर केपटाऊनमधील नेल्डन मंडेला बे येथील त्यांच्या घरी परतत असताना रिव्हर्सडेल येथे त्यांच्या कारचा अपघात झाला. त्यांची कार दुसऱ्या वाहनाला जोराने धडकली, ज्यामध्ये रुडी यांच्यासह तिघांचे प्राण गेले.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अवघ्या क्रिकेट विश्वावर व भारतीय क्रिकेटमध्येही शोकाचे वातावरण आहे.
26 मार्च 1949 साली जन्मलेले रुडी कर्टझन हे तरुणपणात दक्षिण आफ्रिकन रेल्वेजमध्ये लिपीक म्हणून कार्यरत असतानाच त्यांना एकदा स्थानिक सामन्यात पंचगिरीची संधी मिळाली होती. नंतर त्यांनी संपूर्ण वेळ व्यावसायिक पंचगिरी करायला सुरवात केली.
108 कसोटी , http://localhost/news/public/uploads/209 एक दिवसीय तर 14 टी ट्वेंटी सामन्यांत त्यांनी पंच म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर काम पाहिले.
थोडेशे वडिलधारे तरिही मिश्किल म्हणून ओळखल्या जाणार्या रुडी यांच्या स्लो मोशन पद्धतीने फलंदाजाला बाद द्यायच्या अनोख्या सवयीने ते ओळखले जात होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)