ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वरिष्ठ गट ज्युडो स्पर्धेसाठी सिंधुदुर्गातून १२ ज्युडो पट्टूची निवड..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वरिष्ठ गट ज्युडो स्पर्धेसाठी सिंधुदुर्गातून १२ ज्युडो पट्टूची निवड..!

प्रकाशन: 09 Aug 2022 11:02 AM
वाचन संख्या 92

कासार्डे येथे जिल्हास्तरीय निवड चाचणी संपन्न..!

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
नाशिक येथे सलग तीन दिवस होणाऱ्या ४९व्या राज्यस्तरीय वरिष्ठ गट (पुरूष व महिला) स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२खेळाडुंची निवड झाली असून ते त्या ठिकाणी विविध वजनी गटातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा ज्यूडो असोसिएशनच्या वतीने कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे तालुका कणकवली येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्ह्यास्तरीय निवड चाचणी स्पर्धेसाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यातून ज्युडोपट्टूनी हजेरी लावली होती.

या स्पर्धेतून अव्वल स्थान पटकाविलेल्या खेळाडुंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडू मध्ये अजिंक्य पोफळे,भूषण तोरसकर, अंकुश सिंग,यज्ञेश भिमगुडे, विनायक पाटील व दिनेश जाधव या पुरूष ज्यूडो पट्टूंचा तर कोमल जोईल,स्नेहल शिंदे,प्रतिक्षा गावडे,
प्रचिती तारी,तन्वी पवार व ऍडव्होकेट सौ.पूजा जाधव या महिला ज्यूडो पट्टूंचा समावेश आहे.

ही स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्हा ज्यूडो असोसिएशनच्या जिल्हा सचिव दत्तात्रय मारकड , खजिनदार व पंच अभिजित शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तर यशस्वी स्पर्धकांना कासार्डे माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डेचे प्राचार्य एम.डी. खाड्ये,पर्यवेक्षक नारायण कुचेकर यांनी उपस्थित राहून अभिनंदन करीत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

कासार्डे या ठिकाणी झालेल्या जिल्ह्यास्तरीय स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे –
पुरूष गट स्पर्धा –
५६कि.ग्रॅ.खालील वजनगट- अजिंक्य पोफळे -प्रथम,सोनु जाधव – द्वितीय,यशदिप जाधव व साईनाथ शिंदे -तृतीय
६०कि.ग्रॅ.खालील वजनगट–भूषण तोरसकर -प्रथम
७३ कि.ग्रॅ.खालील वजनगट-
अंकुश सिंग -प्रथम
८१ कि.ग्रॅ.खालील वजनगट-
यज्ञेश भिमगुडे -प्रथम
९० कि.ग्रॅ.खालील वजनगट-
विनायक पाटील -प्रथम,मानसन डिसोझा – द्वितीय
१००कि.ग्रॅ.खालील वजनगट-
दिनेश जाधव – प्रथम
महिला गटातील स्पर्धेत
४४कि.ग्रॅ.खालील वजनगट-
कोमल जोईल-प्रथम,संध्या पटकारे- द्वितीय व भक्ती राणे -तृतीय
४८कि.ग्रॅ.खालील वजनगट-
स्नेहल शिंदे -प्रथम, ५२ कि.ग्रॅ.खालील वजनगट- प्रतिक्षा गावडे -प्रथम ५७ कि.ग्रॅ.खालील वजनगट- प्रचिती तारी -प्रथम,समिक्षा केनावडेकर -द्वितीय व प्रसन्न परब तृतीय, ६३ कि.ग्रॅ.खालील वजनगट- तन्वी पवार- प्रथम व अंकिता पाटील -द्वितीय ७०कि.ग्रॅ.खालील वजनगट-
ऍड.सौ.पूजा जाधव – प्रथम
आल्या आहेत. या यशस्वी खेळाडुंचे सिंधुदुर्ग जिल्हा ज्यूदो असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष डाॅ.मिलीद कुलकर्णी , उपाध्यक्ष निळकंठ शेट्ये ,सचिव डी.जे. मारकड, खजिनदार अभिजित शेट्ये,राकेश मुणगेकर, रुपेश कानसे व इतर सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.कालच सिंधुदुर्ग जिल्हा टिम नाशिक येथील राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेसाठी सिंधुदुर्गातून रवाना झाली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स