मालवणात उद्या मोहर्रमचा पारंपारीक सोहळा होणार संपन्न.
दोन वर्षानंतर प्रथमच सोहळा कुठल्याही निर्बंधाविना होणार संपन्न..!
मालवण पोलिसांनी मुस्लीम बांधवांना केलेय विशेष मार्गदर्शन.
मालवण | सुयोग पंडित : उद्या दिनांक 09 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातला पारंपारिक मोहर्रम सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होत आहे.
प्रतिवर्षाप्रमाणे यंदा मोहर्रमच्या 11 व्या दिवशी म्हणजे दि.09 ऑगस्ट रोजी ताज़ीया विधी किल्ले सिंधुदुर्गातून एक प्रदक्षिणा करुन पारंपारिक ताबुत जोड ,पारंपारिक वाद्ये वाजवत होडीमार्फत पिराची भाट हज़रत सय्यद नूरुद्दीन शहा दर्ग्याजवळ सुमारे 1 वाजता येईल. त्या दर्ग्याजवळून दुपारी 02:30 च्या दरम्यान स्थानिक मोठा ताबुत व किल्ले सिंधुदुर्ग येथील छोटा ताबुत पाच प्रदक्षिणा पूर्ण करतील.
नंतर मेढा किनारपट्टीमार्गे बंदरजेटी,सकपाळ नाका,बाॅम्बे नाका,भरड नाका, मॅकोनिकल रोड,फोवकांडा पिंपळ, गणेश मंदिर,राजकोट ,मेढा किनारपट्टीमार्फत दर्ग्याजवळील किनारपट्टीवर या ताबुतांचे होडीमार्फत समुद्रात विसर्जन असा विधी आहे.
या संपूर्ण विधीचा समारोप अंदाजे 09:30 ते 10:00 वाजता होईल.
यंदा या सोहळ्याचे मानकरी म्हणून इम्रान अख्तर मुज़ावर यांच्याकडे सोहळ्याची जबाबदारी आहे.
मालवण शहरातील हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतिक म्हणून सुप्रसिद्ध असा हा सोहळा मुस्लीम बांधवांसमवेत मालवणच्या व्यापारी बांधव व इतर नागरिकांसाठी आस्थेचा असतो.
या सोहळ्याच्या शांततापूर्ण उत्साहासाठी मालवण पोलिस प्रशासनाने मार्गदर्शन केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)