ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कळसुली,जानवली,कलमठ जि.प. विभागात उद्या शिवसेनेच्या महत्वपूर्ण बैठका..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कळसुली,जानवली,कलमठ जि.प. विभागात उद्या शिवसेनेच्या महत्वपूर्ण बैठका..!

प्रकाशन: 08 Aug 2022 01:45 PM
वाचन संख्या 30

आमदार वैभव नाईक, सतिश सावंत, संदेश पारकर यांची प्रमुख उपस्थिती.

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली तालुक्यातील कळसुली, जानवली, कलमठ या जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेच्या महत्वपूर्ण बैठका उद्या मंगळवार दि. ०९ ऑगस्ट २०२२ रोजी त्या त्या विभागात होणार आहेत.

सायंकाळी ०३:०० वाजता कळसुली विभागाची बैठक ओसरगाव गवळवाडी येथील सदा मोरे यांच्या घरी होणार आहे. सायं ०५ :०० वा. जानवली विभागाची बैठक जाणवली ,सखलवाडी येथील सत्यवान राणे यांच्या घरी आणि सायं. ०६:३० वा. कलमठ विभागाची बैठक कलमठ विलास गुडेकर यांच्या घरी होणार आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत,शिवसेना युवानेते संदेश पारकर,अतुल रावराणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या बैठकांना शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजु शेट्ये, महिला संघटक नीलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,सचिन सावंत,राजु राठोड, रामू विखाळे, बाळा भिसे आदींसह जि. प. सदस्य, उपस्थित राहणार आहेत.
तरी या बैठकांना महिला तालुका संघटक, युवासेना तालुका अधिकारी, उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख, विभाग प्रमुख (युवा व महिला), उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, महिला आघाडी शाखाप्रमुख, युवासेना शाखाप्रमुख ,सरपंच, उपसरपंच, जि. प. सदस्य, पं. स. सदस्य, ग्रा. पं. सदस्य, बुथप्रमुख,शिवसैनिक व सर्व माजी पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स