ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मडुरे येथे तुटली विद्युतवाहिनी..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मडुरे येथे तुटली विद्युतवाहिनी..!

प्रकाशन: 07 Aug 2022 09:46 PM
वाचन संख्या 37

शेतकरी व जनावरे सुदैवाने बचावली.

बांदा | राकेश परब :
मडुरा डिगवाडी येथे शनिवारी संध्याकाळी विद्युत वाहिनी तुटली. सुदैवाने शेतकऱ्याच्या व जनावरांच्या जीवावर बेतणारी घटना टळली. मात्र याची कल्पना अधिकाऱ्यांना दिल्यानंतर अधिकाऱ्यांकडून एलटी लाईनसाठी मला फोन करायचा नाही असा निरोप आल्याचे शेतकरी प्रकाश वालावलकर यांनी सांगितले. तसेच सदर ठिकाणी जीवित हानी झाली असती तर त्याला जबाबदार कोण असा सवालही शेतकरी प्रकाश वालावलकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना करत एकूणच कामकाजावर नाराजी व्यक्त केली.

रविवारी सकाळी शेतकरी प्रकाश वालावलकर हे आपल्या जनावरांना घेऊन शेतात जात होते. जाण्या-येण्याच्या मार्गावरच विद्युत वाहिनी तुटल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परंतु काळजी घेतल्यामुळे जीवितहानी टळली. शनिवारी तुटलेली वाहिनी दुसऱ्या दिवशीही तशाच अवस्थेत होती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्युत पुरवठाही सुरू होता. गावात वायरमन नसल्याने बांदा कनिष्ठ अभियंता यांच्याशी संपर्क केला परंतु संपर्क न झाल्याने याची कल्पना सावंतवाडी उपविभागीय अभियंता श्री. भुरे यांना दिल्यानंतर लाईनमन श्री. पांढरभिसे यांच्यामार्फत निरोप आला की एलटी लाइनसाठी आपणास कोणीही संपर्क साधू नये. परंतु आम्हा शेतकऱ्यांना विद्युत वाहिनीमधील कुठच्याही लाईन संदर्भात माहिती नसून आम्ही फक्त तुटलेली वाहिनी आहे याची कल्पना अधिकाऱ्यांना देतो ही आमची चूक झाली का असा खडा सवाल प्रकाश वालावलकर यांनी सावंतवाडी उपविभागीय अभियंता यांना करत तीव्र नाराजी व्यक्त केली.

तसेच विद्युत वहिनी तुटून यापूर्वीही आमचे नुकसान झाले असून भविष्यात आमच्या व जनावरांच्या जीवास धोका निर्माण झाल्यास महावितरण जबाबदार असेल असे श्री. वालावलकर यांनी सांगितले.
दरम्यान, उपविभागीय अभियंता सावंतवाडी यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 453

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स