ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>पाडलोस-केणीवाडा येथे विद्युत वाहिनीला अचानक आग.</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>पाडलोस-केणीवाडा येथे विद्युत वाहिनीला अचानक आग.</em>

प्रकाशन: 07 Aug 2022 08:52 PM
वाचन संख्या 41

बांदा | राकेश परब :
पाडलोस-केणीवाडा येथे विद्युत वाहिनीच्या दुतर्फा वाढलेली झुडपे तोडताना अचानक वाहिनीने पेट घेतल्याने ग्रामस्थ थोडक्यात बचावले. वायरमन देतो असे सांगूनही अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची दिशाभूल केल्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत बांदा कनिष्ठ अभियंता अनिल यादव यांना फोनवरच धारेवर धरले. तसेच उद्या सोमवारी आम्ही तुम्हाला जाब विचारण्यासाठी येत असल्याचा इशारा पाडलोस-केणीवाडा ग्रामस्थांनी दिला.

विद्युत वाहिनी वरील झुडपांची सफाई करण्याचे नियोजन बांदा कनिष्ठ अभियंता अनिल यादव यांना विश्वासात घेऊन करण्यात आले. तसे त्यांनी दोन वायरमन व स्वतः येण्याचे मान्यही केले हाेते असे समीर नाईक यांनी सांगितले. केणीवाडा राममंदिर मार्गावरील अंतर्गत वाहिनी बंद असल्याने झुडपे तोडत असल्यामुळे संपूर्ण वाहिन्या बंद केल्या असल्याची खात्री ग्रामस्थांना झाली व तशा प्रकारे कामही सुरू झाले. परंतु झुडपे तोडताना अचानक वाहिन्यांनी पेट घेतल्याने ग्रामस्थांची तारांबळ उडाली.

ग्रामस्थांनी तात्काळ याची खबर कनिष्ठ अभियंता यादव यांना देत ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि याला सर्वस्वी जबाबदार आपणच असल्याचे भाजप पाडलोस बूथ उपाध्यक्ष हर्षद परब व मळेवाड युवासेना विभागप्रमुख समीर नाईक यांनी सांगितले.

हर्षद परब पुढे म्हणाले की, दोन मिनिटांत येणारा वायरमन किंवा अधिकारी दोन तास झाले तरी घटनास्थळी आला नाही. एकीकडे विद्युत वाहिन्यांवरील झुडपे सफाई करण्यासाठी आम्ही आपणास सहकार्य करतो परंतु दुसरीकडे महावितरण विभागाकडून हलगर्जीपणा केला जात आहे. आज झालेल्या प्रकाराची पुनरावृत्ती झाल्यास खपवून घेणार नसल्याचा इशाराही हर्षद परब यांनी दिला.
कायमस्वरुपी महावितरण कडुन आम्हाला सहकार्य मिळत नाही. विद्युत वाहिनीवरील फरक समजत नसल्यामुळेच आम्ही आपणाजवळ वायरमनची मागणी केली होती तसे तुम्ही देण्याचे आश्वासनही दिले. मात्र काम पूर्णत्वास येईपर्यंत एकही वायरमन घटनास्थळी आला नाही याला काय म्हणावे असा सवाल समीर नाईक यांनी केला.
दरम्यान, पाडलोस-केणीवाडा येथील विद्युत वाहिनीवरील झुडपांची सफाई करण्यासाठी सहकार्याची अपेक्षा करुच नका असा इशारा सर्व ग्रामस्थांनी महावितरणला दिला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 90
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स