ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून बांदा मराठा समाजाच्या वतीने कार्यक्रम...!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून बांदा मराठा समाजाच्या वतीने कार्यक्रम...!

प्रकाशन: 07 Aug 2022 09:53 PM
वाचन संख्या 71

बांदा | राकेश परब :
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून बांदा मराठा समाजाच्या वतीने १४ व १५ ऑगस्टला भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात मराठा समाजाचे अध्यक्ष बाळू सावंत व महिला अध्यक्षा स्वाती सावंत यांनी माहिती दिली.
रविवार दिनांक १४ रोजी सकाळी १० वाजता येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत माजी सैनिक, स्वातंत्र्यसैनिक, शाहिद झालेल्या जवानांच्या वीर पत्नी, वीर माता तसेच ३० हुन अधिक कुटुंबियांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी भोसले नॉलेज सिटीचे अच्युत भोसले, सावंतवाडी संस्थानाचे युवराज लखमराजे भोसले, माजी पोलीस उपायुक्त दयानंद गवस आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी महिला मराठा भगिनींचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम देखील होणार आहे. १५ ऑगस्टला बांदा शहरात होणाऱ्या भव्य प्रभातफेरीतील सहभागी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात येणार आहे.
‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाबाबत समाजात जनजागृती करणे तसेच प्रत्येक घरावर झेंडा फडकविण्यासाठी समाजामार्फत सहकार्य करण्यात येणार असल्याचे बाळू सावंत यांनी सांगितले. यावेळी माजी अध्यक्ष निलेश मोरजकर, सचिव सावंत, सहकार्यवाह राजेश सावंत, उपाध्यक्ष आनंद गवस, दीपक सावंत, विराज परब, स्वप्नील सावंत, रत्नाकर आगलावे, जे डी पाटील, निलेश देसाई, विकी कदम, माधवी गाड, अरुणा सावंत, अवंती पंडित, सुचिता मुळीक, लक्ष्मी सावंत आदिसह मराठा समाजाचे पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स