वेंगुर्ला इनरव्हील क्लबची नुतन कार्यकारिणी जाहीर.
चिंदर | विवेक परब :
इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्लाची सन २०२२-२०२३ ची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. त्यात इनरव्हील क्लब अध्यक्ष म्हणून स्मिता दामले, सेक्रेटरी म्हणून श्रिया परब, ट्रेझरर वॄंदा गवंडळकर, आय.एस.ओ. डाॅ.अफशान कौरी, एडीटर आकांक्षा परब यांची निवड करण्यात आली पदग्रहण सोहळा साईमंगल कार्यालय वेंगुर्ला येथे पि.डी.सि. डॉ सायली प्रभु याच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक ८.८.२०२२ रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत होणार आहे . तरी सदर सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन इनरव्हील अध्यक्षा ज्योती देसाई यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)