<em>भाजप भटके विमुक्त आघाडी वेंगुर्ले तालुका अध्यक्ष पदी नाना कोळेकर यांची निवड..!</em>
भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे यांनी केली निवड जाहीर..!
वेंगुर्ले | प्रतिनिधी : भाजप भटके विमुक्त आघाडी वेंगुर्ले तालुका अध्यक्ष पदी खानोली येथील नाना कोळेकर यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली . सावंतवाडी वेंगुर्ले दोडामार्ग विधान सभा दौऱ्यावर असताना नियुक्ती पत्र प्रदान करत वेंगुर्ले तालुका कार्यालयात भटके-विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी ही निवड जाहीर केली .
याप्रसंगी बोलताना नवलराज काळे म्हणाले की गरीब , वंचित , उपेक्षीत शेवटच्या माणसाप्रती भाजपा ची असलेली भावना ही भाजपा च्या यशाचे गमक आहे . भाजप पक्ष हा बहुजनांचा , गरीबांचा , शोषीतांचा , पिडीतांचा , सर्वसामान्यांचा आहे. देशातील सर्वाधिक दलित , आदिवासी , ओबीसी , महिला या वर्गातील खासदार व आमदार भाजपा चे आहेत . या सामाजिक समरसतेमुळे , विश्वासामुळे भाजपा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे . जिल्ह्यातील जास्तीत जास्त भटक्या विमुक्त जाती बांधव हे भाजपा च्या झेंड्याखाली आणन्यासाठी तालुकानिहाय दौरे करुन भाजपा वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले .
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर , नगराध्यक्ष राजन गीरप , मालवण तालुका भटके विमुक्त आघाडी अध्यक्ष बाळा गोसावी , धनगर समाज जिल्हा अध्यक्ष दिपक खरात , जिल्हा उपाध्यक्ष ॲड .सुषमा खानोलकर व सोमनाथ टोमके , जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक व बाळा सावंत , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , ता.उपाध्यक्ष – प्रीतेश राऊळ – मनवेल फर्नांडिस – लक्ष्मीकांत कर्पे , युवा मोर्चाचे संदीप पाटील – तुषार साळगांवकर – भुषण सारंग , उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर , नगरसेवक प्रशांत आपटे , ता.चिटणीस जयंत मोंडकर , जेष्ठ नेते प्रकाश रेगे , ॲड. जी.जी.टाककर , महिला मोर्चा शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर , महिला मोर्चाच्या – वृंदा गवडंळकर – वृंदा मोर्डेकर – आकांक्षा परब – सारिका काळसेकर ,
शक्ती केंद्र प्रमुख – महादेव नाईक ( आरवली ) – जगंन्नाथ राणे ( रेडी ) – संतोष शेटकर ( तुळस ) – नितीन चव्हाण ( वजराठ ) – कमलेश गावडे ( पाल ) – सुधीर गावडे ( वेतोरे ) – विजय बागकर ( आसोली ) – विद्याधर धानजी (शिरोडा ) – सुनील चव्हाण ( परुळे ) – रुपेश राणे ( कुशेवाडा ) – निलेश मांजरेकर ( उभादांडा ) , तुळस सरपंच शंकर घारे , प्रभारी ज्ञानेश्वर केळजी , शिरोडा शहर अध्यक्ष संदिप धानजी , ता.का.का.सदस्य सुनील घाग , खानोली उपसरपंच सुभाष खानोलकर ,
बुथप्रमुख – शेखर काणेकर – नारायण गावडे – पुंडलिक हळदणकर – वसंत परब इत्यादी उपस्थित होते .
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)