कोकणातील पर्यटन वाढीसाठी ९ ऑगस्टला पर्यटन योजनांबद्दल मार्गदर्शन शिबिराचे आयोजन..!
संतोष साळसकर | ब्युरो चीफ : कोकणातील पर्यटन व्यवसाय वाढीसाठी बँक ऑफ इंडिया व पर्यटन संचालनालय कोकण विभाग नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ९ ऑगस्ट २०२२ रोजी दापोली येथे दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज सभागृहात स. १० ते दू. १ वाजेपर्यंत बँक ऑफ इंडियाचे वित्तीय सहाय्य आणि पर्यटन संचालनालय यांच्या पर्यटन व्यावसायिकांसाठी असलेल्या विविध पर्यटन योजनाबद्दल माहिती देण्यासाठी या मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती श्री. हनुमंत हेडे उपसंचालक, पर्यटन संचालनालय यांनी प्रसिधदी पत्रकाच्याच्या माध्यमातून दिली आहे.
कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिक यांना व्यवसाय वाढीसाठी मोलाचे मार्गदर्शन या शिबिरात केले जाणार आहे. श्री. हनुमंत हेडे उपसंचालक, पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन आणि श्री. संतोष सावंत देसाई क्षेत्रिय प्रबंधक, रत्नागिरी क्षेत्र बँक ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शनाचा लाभ होणार आहे.
कोकणात रोजगार निमिर्तीसाठी मोलाचे कार्य राज्य पर्यटन संचालनालय कोकण विभाग आणि बँकेच्या माध्यमातून केले जात आहे. गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे कोकणातील व्यवसायिकांना आर्थिक नुकसानीचा फटका बसला आहे. त्याच पार्श्वभूमीवर व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी व नवउद्योजकास व्यवसाय वाढीसाठी म्हणून आर्थिक सहाय्य मार्गदर्शन केले जाणार आहे. बँके ऑफ इंडिया तर्फे पर्यटनावर अवलंबून असलेल्या पात्र पर्यटन व्यावसायिकांना दहा लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय बँक ऑफ इंडिया यांनी घेतला आहे अशी माहिती श्री. हनुमंत हेडे यांनी दिली. या शिबिराचा लाभ घेण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)