ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
मसुरे येथील बीएसएनएल टॉवर मृता अवस्थेत ; गेले कित्येक महिने 3G ,4G सेवा गायब….!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मसुरे येथील बीएसएनएल टॉवर मृता अवस्थेत ; गेले कित्येक महिने 3G ,4G सेवा गायब….!

प्रकाशन: 07 Aug 2022 10:25 AM
वाचन संख्या 60

कार्यवाही न केल्यास आंदोलन छेडण्याचा लक्ष्मी पेडणेकर यांचा इशारा…!

मसुरे | प्रतिनिधी :
मसुरे येथील बी.एस.एन .एल टॉवर अखेरची घटका मोजत असून अवघ्या १०० मीटर अंतरावर नीट रेंज मिळत नाही आहे . याबाबत सर्व संबंधित अधिकारी वर्गाचे वारवार लक्ष वेधून ही अद्याप पर्यंत या प्रश्न संबंधी कोणीही अधिकारी कार्य तत्परता दाखवत नसून फक्त बघण्याचे काम करत असल्यामुळे येत्या आठ दिवसात या टॉवर संदर्भात योग्य ती दुरुस्ती न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा भारतीय जनता पक्षाच्या मालवण तालुका महिला अध्यक्ष तथा माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर यांनी दिला आहे. तसेच यासंदर्भात केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांचेही लक्ष वेधणार असल्याची माहिती पेडणेकर यांनी दिली.
मसुरे येथे असलेला बीएसएनएल टॉवर गेले कित्येक महिने नादुरुस्त अवस्थेत असून याचा त्रास मसुरे सहित परिसरातील गावातील बीएसएनएल ग्राहकांना होत आहे. अवघ्या 50 ते 100 मीटर अंतरावर ती थ्रीजी फोरजी सेवा मिळत नसल्यामुळे येथील सर्व शासकीय कार्यालय, तलाठी ऑफिस, पोस्ट ऑफिस, बँका, ग्रामपंचायत,परिसरातील शाळा यांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. याबाबत माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर यांनी सर्व संबंधित अधिकारी वर्गाचे लक्ष वेधून घेतले होते. तथापि या अधिकारी वर्गाने कोणतीही ठोस कृती केलेली नाही. फक्त या प्रश्नाबाबत लवकरात लवकर दुरुस्ती करू असे आश्वासन दिले होते. परंतु अद्यापही कार्यवाही शून्य आहे . या सर्व अधिकारी वर्गाबाबत मसूरे येथील ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. गेले कित्येक महिने हा टॉवर नादुरुस्त अवस्थेत असूनही याकडे अधिकारी वर्ग लक्ष देत नसल्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
येत्या काही दिवसात त्रिजी , फोर जी सेवेच्या बाबतीत योग्य ती दुरुस्ती न केल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा भारतीय जनता पक्षाच्या महिला तालुका अध्यक्ष तथा मसुरे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर यांनी दिला आहे..

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स