सिंधुदुर्ग जिल्हाअधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली नांदरूख " येथील अमृतसरोवरला" भेट…!
चौके | अमोल गोसावी :
मालवण तालुक्यातील नांदरुख गावामध्ये ग्राम सेवा संघ” व ग्रामपंचायत नांदरूख यांच्यावतीने अमृत-सरोवर या योजने अंतर्गत लोकसहभागातून स्थानिक साधन सामग्रीवर आधारित अभिनव पद्धतीने
नांदरूख ग्रामदैवत श्री देव गिरोबा देवालय येथील तलावाच्या बंधाऱ्याचे काम सुरू आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी या पुर्वी संबंधीत तलावाची समतल खोदई देखिल लोकसहभागातून केली आहे.
स्वराज्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पार पडणाऱ्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या योजने अंतर्गत कोकणात विशेषतः तळकोकणात स्थानिक पार्श्वभूमीवर उपयुक्त ठरेल व कमीत कमी खर्चात सहज बांधता येईल, अशा स्वरूपाची या बंधाऱ्याची रचना असुन शेकडो वर्षे हा बंधारा कायम राहील अशा पद्धतीने स्थानिकांच्या सहकार्यातुन या बंधाऱ्याचे काम सुरू आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते महेश जुवाटकर यांच्या संकल्पनेतून व स्थानिक लोकसहभागातून होणारे विशेष उल्लेखनीय बाब म्हणुन जिल्हाधिकारी के. मंजुलश्र्मी यांनी या बंधाऱ्यांच्या ठिकाणी आपली उपस्थिती नोंदवुन समाधान व्यक्त केले.
यावेळी कार्यकारी अभियंता जि.प. पाणीपुरवठा उदयकुमार महाजनी, लघुपाटबंधारे अभियांता जी. भोसले , सरपंच श्री दिनेश चव्हाण, ग्रामसेवक श्री. महेंद्रमोरे, तलाठी सौ. समीरा सावंत, राहुल परब, सामाजिक कार्यकर्ते महेश जुवाटकर, समीर पाटकर, ग्रामस्थ काशिनाथ चव्हाण, रमेश पोमजी चव्हाण, विनोद चव्हाण, संदेश घाडीगावकर, सुनिल चव्हाण, नंदु चव्हाण, स्वप्नील साळकर, घनश्याम परब, विशेष उपस्थीत होते.
याप्रसंगी संबंधित तलावाच्या परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी तसेच ओपन जिम उभारण्यासाठी भरीव निधी देण्याचे अभिवचन मा. जिल्हाधिकारी यानी दिले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)