रोटरी क्लब ऑफ वैभववाडीच्या वतीने शुक नदीवरील पुलाची साफसफाई..!
वैभववाडी | नवलराज काळे :
वैभववाडी तालुक्यात रोटरी क्लब ऑफ वैभववाडी स्थापन झाल्यानंतर विविध उपक्रम रोटरी क्लबच्या वतीने वैभववाडी तालुक्यात राबवण्यात येत आहेत त्याच पार्श्वभूमी वरती आज वैभववाडी तालुक्यातील सुख नदी वरील पुलाला रानाने वेडा घातला होता.
रोटरी क्लब ऑफ वैभववाडी च्या वतीने आज त्या ठिकाणी साफसफाई करून एक प्रकारे सुख नदीवरील पुलाने मोकळा श्वास घेतल्याचे चित्र दिसत आहे.
कोल्हापूर गोवा मुख्य हायवे मार्गावरती हा पुल असून त्या भोवताली ची साफसफाई झाल्यामुळे परिसर अतिशय सुंदर दिसत आहे. रोटरी क्लब ऑफ वैभववाडी च्या वतीने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)