स्पर्धा परीक्षा यशाचा राजमार्ग - सहाय्यक पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील.
चिंदर ग्रामपंचायतीच्या वतीने दहावी, बारावी, बीडीएस् परीक्षांत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार…!
चिंदर | विवेक परब :
मालवण तालुक्यातील चिंदर ग्रामपंचायतीच्यावतीने दहावी, बारावी, बीडीएस् तसेच इतर स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मुलांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
प्रमुख पाहुणे म्हणून आचरा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील उपस्थित होते. उपसरपंच दिपक सुर्वै यांच्या हस्ते पाटील यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मार्गदर्शन करताना पाटील यांनी आजच्या स्पर्धेच्या युगात स्पर्धा परिक्षा म्हणजे यशाचा राजमार्ग आहे आणि तो तुम्ही अवलंबा स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर अनेक ठिकाणी चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी आपण कधीही तयार आहोत असा शब्द पाटील यांनी मुलांना दिला.
विविध मान्यवरांनी यावेळी मुलांना मार्गदर्शन केले. केंद्र प्रमुख प्रसाद चिंदरकर यांनी कौशल्यावर निष्ठा ठेवा व कोणत्याही क्षेत्रात मनापासून काम करा असा, सौ. आर्या साटम यांनी वाणिज्य शाखेतून पदवी नंतर खुले होणारे मार्ग तसेच माजी पंचायत समिती सभापती धोंडी चिंदरकर यांनी व्यसना पासून दुर रहा व नकारात्मक गोष्टीतून सकारात्मक व्हा व चिंदर गावचे आदर्श व्यक्तीमत्व आयपीएस् सुब्रमण्यम केळकरांचा आदर्श डोळ्या समोर ठेवा असे मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच सौ. राजश्री कोदे तसेच मंडल अधिकारी अजय परब यांनीही मार्गदर्शन केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सौ. स्वरा पालकर, सौ. रिया घागरे, सौ. जान्हवी घाडी, सरपंच सौ. राजश्री कोदे, प्रिया पालकर, सोयायटी व्हाईस चेअरमन सुनिल पवार, पोलिस नाईक अक्षय धेंडे, तलाठी योगेश माळी, पोलिस पाटील दिनेश पाताडे, दिगंबर जाधव, मनोज हडकर, संतोष अपराज, विश्राम माळगांवकर, आबा पवार तसेच पालक, शिक्षक, उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक ग्रामपंचायत सदस्य सौ. दुर्वा पडवळ यांनी तर सुत्र संचालन व आभार ग्रामपंचायत सदस्य शशिकांत नाटेकर यांनी मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)