ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मसुरे गावचा सुपुत्र आशिष विजयसिंह प्रभूगावकर यांना भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम बीइए नॅशनल अवॉर्ड 2022 प्रदान..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मसुरे गावचा सुपुत्र आशिष विजयसिंह प्रभूगावकर यांना भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम बीइए नॅशनल अवॉर्ड 2022 प्रदान..!

प्रकाशन: 04 Aug 2022 10:53 AM
वाचन संख्या 65

राज भवन येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान…!

मसुरे | प्रतिनिधी :
मसुरे गडघेरा वाडी येथील सुपुत्र आशिष विजयसिंह प्रभूगावकर यांना भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम बीइए अवॉर्ड्स http://localhost/news/public/uploads/2022 हा अखिल भारतीय स्तरावरील पुरस्कार नुकताच राजभवन येथे माननीय राज्यपाल भगतसिंग कोषारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी एन ए एफ ए आर डी चेअरमन डॉलर पटेल, जनरल सेक्रेटरी शमीम खान आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम ग्लोबल फाउंडेशन आणि परवाज मीडिया ग्रुप यांच्या वतीने देशातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या वीस महनीय व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये मसुरे गावचे सुपुत्र आशिष विजयसिंह प्रभूगावकर यांना देशाचे वाढते व्यक्तिमत्व या क्षेत्रामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्यासोबत उदित नारायण, बी अब्दुल्ला यांनाही हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आशिष प्रभूगावकर यांनी देशभरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. उद्योग, सामाजिक, कामगार,कला, क्रीडा विविध क्षेत्रात देशामध्ये भरीव अशी कामगिरी केली आहे.त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन देशातील मानाचा असा भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम नॅशनल अवॉर्ड्स http://localhost/news/public/uploads/2022 साठी त्यांची निवड करण्यात आली. आशिष प्रभूगावकर हे मसुरे गावचे सुपुत्र असून मसुरे गावच्या सामाजिक, कला क्रीडा धार्मिक, व्यापार, शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे भरीव असे योगदान आहे. माजी राज्यमंत्री बापूसाहेब प्रभूगावकर यांचे ते सुपुत्र आणि माजी जी प अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर यांचे ते बंधू आहेत. देश पातळीवरील या पुरस्कारा बाबत आशिष प्रभूगावकर यांचे मसुरे गावात विशेष कौतुक होत असून लवकरच त्यांचा युथ फाउंडेशन मसुरे च्या वतीने नागरी सत्कार करण्यात येणार आहे. या वेळी बोलताना आशिष प्रभुगावकर म्हणालेत या पुरस्काराने आपली जबाबदारी आणखीन अधिक वाढली असून यापुढेही देशाला आदर्श असेच सर्व क्षेत्रात कार्य करेन.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स