व्ही.एन.नाबर इंग्लिश मिडीयम स्कुल, बांदा येथे वक्तृत्व स्पर्धा संपन्न...!
बांदा |राकेश परब :
श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईच्या व्ही. एन .नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल बांदा प्रशालेत सोमवार दिनांक १ ऑगस्टला लोकमान्य टिळक पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली.यावेळी व्यासपीठावर प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ .मनाली देसाई, उपमुख्याध्यापिका, सौ. शिल्पा कोरगावकर, हेलन रॉड्रीग्स,अनिशा रॉड्रीग्स,चित्रलेखा नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमपूजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे औचित्य साधून वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते .स्पर्धांचा निकाल पुढील प्रमाणे
पहिली ते दुसरी गट –
श्रेया हळदणकर -प्रथम
मयुरेश डेगवेकर -द्वितीय
तिसरी ते चौथी गट
माधव डेगवेकर-प्रथम
चैतन्य महाबळ -द्वितीय
पाचवी ते सातवी गट –
ऋतुराज नाईक -प्रथम
सुयश गावकर -द्वितीय
रत्नाकर ओगले -तृतीय
आठवी ते दहावी –
अल्फीया खतिब -प्रथम
स्पर्धेचे परीक्षण प्रशालेच्या इंग्रजी विषयाच्या शिक्षिका हेलन रॉड्रीग्स,अनिशा रॉड्रीग्स यांनी केले .प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई यांनी टिळक व अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित प्रसंग विद्यार्थ्यांना सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री हर्षद खडपकर यांनी तर आभार प्रदर्शन कु.अथर्व नाईक याने मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)