<em>कंत्राटी वीज कामगार रघुवीर पांचाळ यांना अशोक सावंत यांच्या हस्ते नियुक्ती पत्र…!</em>
चिंदर | विवेक परब :
जिल्ह्यातील काही कंत्राटी कामगारांना महावितरणच्या ८५ टक्केच्या परिपत्रकामुळे कमी केले होते. यात कमी केलेल्या जिल्ह्यातील काही कामगारांना काही दिवसापूर्वी तर देवगड येथील रघुवीर पांचाळ या कामगाराला सिंधुदुर्ग कंत्राटी कामगार संघटनेचे जिल्ह्याध्यक्ष अशोक सावंत यांच्या हस्ते आज नियुक्ती पत्र देण्यात आले.
संपूर्ण राज्यात १०० टक्के कंत्राटी कामगार भरतीसाठी सिंधुदुर्ग वीज कंत्राटी कामगार संघटना प्रयत्नशील राहणार तसेच आश्वासन हे कृतीतून शासनाकडून घेण्यासाठी संघटना बांधील राहिल. असे अशोक सावंत यांनी स्पष्ट केले.
यावेळी कंत्राटी कामगार धोंडू पवार, रुपेश जाधव, हरेश लांबोरे आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)