ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कौशल्य  विकास योजने अंतर्गत केक,मेणबत्ती व अगरबत्ती अद्यावत विनामूल्य प्रशिक्षणाचां लाभ व्यावसायिकांनी घ्यावा ; सौ वैष्णवी मोंडकर अध्यक्ष मातृत्ववरदान फाउंडेशन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कौशल्य विकास योजने अंतर्गत केक,मेणबत्ती व अगरबत्ती अद्यावत विनामूल्य प्रशिक्षणाचां लाभ व्यावसायिकांनी घ्यावा ; सौ वैष्णवी मोंडकर अध्यक्ष मातृत्ववरदान फाउंडेशन.

प्रकाशन: 02 Aug 2022 07:21 PM
वाचन संख्या 59

शिरगांव | संतोष साळसकर :
सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वयंरोजगाराच्या माध्यमातून जिल्ह्याच्या स्थानिक व्यावसायिकांस रोजगार निर्मितीचे साधन उपलब्ध व्हावे या उद्धेशाने मातृत्ववरदान फाऊंडेशन व पर्यटन व्यावसायिक महासंघ च्या माध्यमातून मेणबत्ती व अगरबत्ती बनविणे विषयी प्रशिक्षण शिबीर आयोजित केले असून सदर प्रशिक्षण हे विनामूल्य असून यामध्ये मार्केटिंग ,कच्चामाल बनविणे माहिती ,प्रात्यक्षिक तसेच यातील स्थानिक व राष्ट्रीय मार्केट मध्ये विक्री होणारे प्रकार ,ब्रँड डेव्हलपमेंट आकर्षक पॅकेजींग,मार्केट सर्वे याचें प्रशिक्षण दिले जाणार असून व्यवसाय उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या शासकीय कर्ज सुविधा अनुदान याविषयी माहिती दिली जाणार असून सदर प्रशिक्षण शिबीर हे १६ ऑगस्ट २०२२ पासून हॉटेल श्री महाराज मालवण येथे आयोजित करण्यात आले असून दहा दिवसांचा कालावधी राहणार असून या मध्ये जेवण व नाष्टा व प्रशिक्षण फी पूर्ण पणे मोफत असून हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर शासकीय सर्टिफिकेट देण्यात येणार आहे .तसेच रविवार ७ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १० ते ५ वेळेत हॉटेल श्री महाराज येथे एडव्हांस केक बनविण्याचे शिबीर घेण्यात येणार असून या मध्ये रेड वेलवेट केक,शिमर केक ,पिनाटा केक,जीओड केक,पुल मी अप केक व व्हेज व नॉनव्हेज स्लाईस केक यांचे प्रशिक्षण दिले जाणार असून या सर्व प्रशिक्षणासाठी इच्छूक व्यक्तींनी आपली नावे 82751 06375 या व्हॉट्सअप नंबरवर किंवा हॉटेल श्री महाराज मालवण येथे नाव नोंदणी करावी असे आवाहन मातृत्ववरदान फाउंडेशन अध्यक्ष सौ.वैष्णवि मोंडकर यांनी केली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स