<em>जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते श्री रामेश्वर वि.का.स से सोसायटी लि. चिंदरचा गौरव…..!</em>
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील 28 विकास संस्था पैकी 3 संस्थानी
बँक कर्जाची 100% पूर्ण फेड केली त्या प्राथमिक संस्थांचा विविध कार्यकारी सहकारी संस्थाचे तसेच तालुक्यातील इतर संस्था नुतन संचालक चेअरमन, व्हाईस चेअरमन यांचे अभिनंदन करण्यासाठी आज जानकी मंगल कार्यालय कुंभारमाठ मालवण येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते श्री रामेश्वर वि.का.स. सेवा सोसायटी लि.चिंदर या अग्रक्रमी संस्थेचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी संस्था चेअरमन सिताराम हडकर, संचालक दिगंबर जाधव, विवेक(राजु) परब, सचिव कविंद्र माळगांवकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सहकाराच्या त्रिसूत्रीचा पाया विकास संस्था आहेत त्या सक्षम केल्या शिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही.संस्था सक्षम करुन शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी बँक प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन केले.
यावेळी व्यासपिठावर व्हिक्टर डान्टस, जिल्हा बँक संचालक मेघनाथ धुरी, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुध्द देसाई, कर्ज विभाग प्रमुख वरक, मुळये चौकेकर, जिल्हा बँक अधिकारी, कर्मचारी, तसेच अनेक संस्थाचे संचालक, सचिव, चेअरमन, व्हाईस चेअसरमन उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)