ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
स्थानिक गुन्हा अन्वेषणाची बेकायदेशीर दारु वाहतुकीवर कारवाई.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

स्थानिक गुन्हा अन्वेषणाची बेकायदेशीर दारु वाहतुकीवर कारवाई.

प्रकाशन: 29 Jul 2022 10:16 AM
वाचन संख्या 83

बांदा | राकेश परब :
मुंबई गोवा महामार्गावर बांदा कट्टा काॅर्नर येथे कार मध्ये वेगळा कप्पा बनवून त्यातून दारू वाहतूक केल्याप्रकरणी गुजरात -जुनागड येथील दोघांना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. या कारवाईत ७० हजार ८०० रुपये किमतीच्या गोवा बनावटीच्या दारूसह चार लाखाची मारुती इको गाडी जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई आज पहाटे शहरात बांदा-कट्टा काॅर्नर येथे करण्यात आली.
बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी सलपतगिरी मेघनाथपंथी चंदूगिरी (वय ३५) व भरतभाई पोपटभाई माजा (वय २८, दोघे रा. गुजरात) अशी संशयितांची नावे आहेत. ही कारवाई गुरुवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्ग कट्टा काॅर्नर परिसरात करण्यात आली.
याबाबत बांदा पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,दारू वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर बांदा शहरात कट्टा कॉर्नर महामार्गवर गुरुवारी सकाऴी सहा वाजण्याच्या सुमारास स्थानिक अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा रचला होता. त्यादरम्यान गोव्याहून ही इको कार येताना दिसली. यावेळी त्या गाडीची तपासणी केली असता कार च्या मागील डिकीत व सीटवर गोवा बनवटीच्या दारूचे विविध ब्रँडचे खोके आढळले. पोलिसांनी सुमारे ७३ हजाराची दारू व मोटार जप्त केली. याप्रकरणी गुजरात येथिल दोघांना अटक करण्यात आली. बांदा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी यशवंत आरमारकर, पोलीस हवालदार गुरुनाथ कोयंडे, जी.पी. पोहेंदे, प्रकाश कदम, अनिल धुरी, प्रवीण वालावलकर, चंद्रकांत पालकर, सर्वेश नार्वेकर, प्रथमेश गावडे यांच्या या पथकाने केली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 453

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स