ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>महाराष्ट्र राज्यात कांदळवन प्रकल्पामध्ये प्रथम क्रमांक आलेल्या सागरतीर्थ गावातील "कडोबा गटाचा" भाजप वेंगुर्ला तालुक्याच्या वतीने भव्य सत्कार….!</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>महाराष्ट्र राज्यात कांदळवन प्रकल्पामध्ये प्रथम क्रमांक आलेल्या सागरतीर्थ गावातील "कडोबा गटाचा" भाजप वेंगुर्ला तालुक्याच्या वतीने भव्य सत्कार….!</em>

प्रकाशन: 29 Jul 2022 10:22 AM
वाचन संख्या 44

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
वेंगुर्ला तालुक्यातील सागरतीर्थ गावातील “कांदळवन” समिती यांनी गेल्या दोन वर्षापूर्वी “कडोबा” कांदळवन संवर्धन बचत गट स्थापन करुन यंदाच्या वर्षी कांदळवन संवर्धनामध्ये प्रभावी कार्य करुन व्यवसाय निर्माण केला या प्रभावी कार्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील कांदळवन संवर्धनामध्ये त्यांचा “प्रथम” क्रमांक आला.
दोन दिवसापूंर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कडून त्यांना १ लाखाचा धनादेश व प्रशस्तीपत्रक देऊन या गटाचा सन्मान करण्यात आला होता.
या वेंगुर्ला तालुक्यातील प्रथमच विशेष कार्याबद्दल भाजप वेंगुर्ला तालुकाच्या वतीने सागरतीर्थ टांक (गांबीत वाडी) येथील विठ्ठल मंदिरामध्ये “कडोबा गट” या ग्रुपचा सन्मान करण्यात आला.
या सत्कार समारंभाचे सूत्र संचलन व आभार आसोली येथील भाजप ज्येष्ठ पदाधिकारी प्रकाश रेगे यांनी केले .
कांदळवन समितीचे निकेश प्रभू यांनी “कडोबा गट” यांनी कांदळवन संवर्धन मध्ये केलेल्या कार्याबद्दल माहिती दिली.
त्यानंतर या विशेष सत्कारासंदर्भात भाजप, सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी कडोबा गटाचे कौतुक करुन पर्यावरण संवर्धनामध्ये केलेल्या कार्याची दखल शासनाने घेतल्या बद्दल समाधान व्यक्त केले. तसेच भविष्यात कांदळवन सफारी सुरू करुन पर्यटन व्यवसायात सुद्धा भरारी घ्यावी अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजप वेंगुर्ला तालुका अध्यक्ष सुहास गवंडळकर, उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे व मनवेल फर्नाडिस, शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, आरवली सरपंच तातोबा कुडव, आसोली रेडी शक्ती केंद्र प्रमुख विजय बागकर व जगन्नाथ राणे, सागरतीर्थ बुथप्रमुख देवेंद्र उर्फ बाळू वस्त, सागरतीर्थ भाजप पदाधिकारी अनुराधा मोठे, दिपमाला आचारी, सचिन वस्त, भाजप शिरोडा शहर अध्यक्ष श्रीकृष्ण धानजी, भाजप शिरोडा युवा मोर्चा अध्यक्ष सोमाकांत सावंत, भाजप शिरोडा शहर ज्येष्ठ पदाधिकारी चंद्रशेखर गोडकर, शिरोडा ग्रामस्थ महेश न्हावेलकर हे मान्यवर उपस्थित होते या मान्यवरांच्या हस्ते सागरतीर्थ कांदळवन समिती अध्यक्ष खिस्तू सोज ,सदस्य – राधाकृष्ण पेडणेकर, निकेश प्रभू ,”कडोबा” कांदळवन संवर्धन बचत गटाचे सचिव निलेश प्रभू , सदस्य – राजन मोंडकर, सुहास मोंडकर , प्रभाकर मोंडकर, बेजमी फर्नाडिस, प्रसाद आचरेकर, राजन चोपडेकर, निवृत्ती तांडेल, आदित्य तांडेल, सुनिल चोपडेकर, सुचित चोपडेकर, बाबाजी आरोदेकर, रघुनाथ मोडंकर, नरेश तांडेल, नंदकिशोर गवंडे, रेजिनाल्ड फर्नाडिस यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. त्याच प्रमाणे वेंगुर्ला तालुक्याच्या वतीने वेंगुर्ला तालुका अध्यक्ष सुहास गवंडळकर व भाजप, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांच्या हस्ते वरील विशेष कार्याबद्दल “कडोबा” कांदळवन संवर्धन बचत गटाचे अध्यक्ष नरेंद्र मोंडकर यांचा शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 452

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स