<em>शाळेतील मुलांना होणारा विलंब आणि गैरसोय दुर करण्यासाठी पळसंब सरपंचानी विभाग नियंत्रकांना दिले निवेदन..!</em>
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
कणकवली बसस्थानकातून सकाळी ६ वाजता सुटणारी कणकवली आचरा मार्गे मालवण एस्.टी बंद केल्याने आचरा काॅलेजला जाण्या-या मुलांची होणारी गैरसोय तसेच हिच गाडी परत येते वेळी आडवली हायस्कूलला जाणाऱ्या शाळेतील मुलांची सोय होत होती.
ती हि गाडी बंद असल्याने गैरसोय होत आहे याचे गांभिर्य लक्षात घेऊन बस फेरी पुर्ववत करावी या मागणीसाठी विभाग नियंत्रक कणकवली यांना पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी निवेदन दिले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)