ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मालवणच्या ग्रामदैवतांचे सात्विक श्रावण महिन्यातील धार्मिक विधी व कार्यक्रम जाहीर..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवणच्या ग्रामदैवतांचे सात्विक श्रावण महिन्यातील धार्मिक विधी व कार्यक्रम जाहीर..!

प्रकाशन: 28 Jul 2022 09:09 PM
वाचन संख्या 154

8 ऑगस्टला श्री देवी सातेरीची जत्रा..!

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या ग्रामदैवत श्री देव रामेश्वर, श्री देव नारायण, श्री देवी सातेरी व इतर दैवतांचे सात्विक श्रावण महिन्यातील पवित्र धार्मिक विधी व कार्यक्रम जाहीर झाले आहेत.

श्रावण महीन्यातील कार्यक्रमांचा आरंभ पहिला श्रावण सोमवार ०१ ऑगस्ट २०२२ पासून होत आहे. या दिवशी भक्ती गायनाचा कार्यक्रम (सायं. ४ ते ७ वाजेपर्यंत) असे वैशिष्ट्य असेल.

शुक्रवार दि. ०५ ऑगस्ट रोजी पहिला दादरा (खापरेश्वर) (सायं. ६.३० वा. निघतील.)
रविवार दि. ०७ ऑगस्ट २०२२ रोजी दुसरे दादरा निघतील
दोन्ही दादरे काढणे रांजेश्वर, सिसमोडा (सायं. ६.३० वा. निघतील)

दुसरा श्रावण सोमवार दि. ०८ ऑगस्ट २०२२ रोजी असून त्यादिवशी श्री देवी सातेरीची जत्रेचे आयोजन केले आहे. (स.१० वा. पासून ओटी भरण्याचा कार्यक्रम)

तिसरा श्रावण सोमवार दि. १५ ऑगस्ट २०२२ रोजी असून त्यादिवशी भजनाचा कार्यक्रम (सायं. ५ ते ८ वाजेपर्यंत) रंगणार आहे.
श्री देव नारायण मंदिरमध्ये गोकुळ अष्टमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवार दि. १८ ऑगस्ट ते मंगळवार दि. २३ ऑगस्ट २०२२ पर्यंत रोज रात्रौ ७.३० वाजल्यापासून पुराण व किर्तनाचा कार्यक्रम. चौथा श्रावण सोमवार दि. २२ ऑगस्ट २०२२ रोजी स. ८ वाजता लघुरुद्र स. ९.३० वा. श्री वरदशंकराची महापूजा (तिर्थप्रसाद १ वा. पासून) सायं. ४ ते रात्रौ ९ वाजता गायन व भजने असे कार्यक्रम असतील.

याच दिवशी श्री भावई देवीची जत्रा (स. १० वा. ओटी भरण्याचा कार्यक्रम) आयोजीत होत आहे.

सात्विक श्रावणातील या सर्व मंगल कार्यक्रमांचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा अशी देवस्थानतर्फे नम्र विनंती करण्यात आली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स