जनता विद्या मंदिर त्रिंबकला एक्वा बेनेवोलेंट फंड NGO कडून दहा सायकल भेट.
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
मालवण तालुक्यातील जनता विद्या मंदिर त्रिंबक प्रशालेतील मुलांना आज एक्वा बेनेवोलेंट फंड या NGO कडून दहा सायकल भेट देण्यात आल्या. NGO चे प्रतिनिधी श्री. पेडणेकर यांच्या हस्ते मुलांना मोफत सायकल वितरित करण्यात आल्या. यावेळी संस्था अध्यक्ष प्रताप बागवे, कार्यवाह सुरेंद्र (अन्ना) सकपाळ, मुख्याध्यापक प्रविण घाडीगांवकर, सहशिक्षक एकनाथ गायकवाड, अभिजित धुरे, महेंद्र वारंग, संतोष मेस्री, गोसावी, मेहेंदळे, साटम तसेच विद्यार्थी उपस्थित होते. प्रशालेने सुरुवातीला गोवा विमान प्राधिकरण CSR (परिवर्तन केंद्रातून)निधीतून मिळालेल्या 10 सायकली पासून सायकल बँक स्थापन केली. परिवर्तन केंद्र संयोजक विलास हडकर यांची सायकल बँक संकल्पना सुरेंद्र(अन्ना) सकपाळ तसेच संस्था यशस्वी पणे राबवून सायकलीची भर घालत आहे. यामुळे लांबून येणाऱ्या मुलांना वेळ वाचण्यास मदत होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)