देवगड पंचायत समितीच्या १६ गणांकरिता आरक्षण सोडत जाहीर...!
शिरगांव / संतोष साळसकर :
देवगड पंचायत समितीच्या १६ गणांपैकी ८ गण महिला करीता राखीव झाले असून शिरगांव पंचायत समिती गण (३२)हा अनुसूचित जाती महिला प्रवर्गाकरिता आरक्षित झाला आहे.या बरोबरच दाभोळे पं.स.गण (३५) व पुरळ पं.स.गण (२६) ना.मा.प्र. महिला प्रवर्गाकरिता आरक्षित झाला आहे.देवगड पंचायत समितीच्या १६ गणांकरिता आरक्षण सोडत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांच्या अधिपत्याखाली देवगड तहसीलदार मारुती कांबळे, नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर,वरिष्ठ सहाय्यक श्री वेंगुर्लेकर यांच्या उपस्थितीत देवगड तहसीलदार कार्यालयात काढण्यात आली .
या सोडतीत देवगड तालुक्यातील भाजप, शिवसेना ,या प्रमुख पक्षाच्या दिगग्ज नेत्यांना धक्का बसला आहे.यात भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य, शिवसेना तालुका प्रमुख, यांना आणखी पाच वर्षे उमेदवारीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
आरक्षण सोडत शालेय विद्यार्थिनी चैतन्या तुषार पांचाळ हिच्या हस्ते काढण्यात आली ती पुढीलप्रमाणे आहे.
अनुसूचित जाती महिला -शिरगाव पं.स.गण(३२), ना.म.प्र. महिला पुरळ,पं.स.गण (२६)दाभोळे(३५)-पं.स.गण
,ना.मा.प्र. प्रवर्ग – नाडण,पं.स.गण(३३) पडेल,पं.स.गण(२७)
सर्वसाधारण महिला -कुवळे,पं.स.गण(३८) महाळुंगे, पं.स.गण(३१),विजयदुर्ग पं.स.गण(२५), बापर्डे पं.स.गण(२८), मोंड,पं.स.(३४)
सर्वसाधारण प्रवर्ग, पोंभुर्ले,पं.स.गण(२९) गोवळ,पं.स.गण(३०) कुणकेश्वर,पं.स.गण(३६) किंजवडे,पं.स.गण(३७) मिठबाव पं.स.गण(२९), मुणगे पं.स.गण(४०) याप्रमाणे आहे.
राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची उदासीनता या वेळी दिसून आली .
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मिलिंद साटम काँग्रेस तालुका अध्यक्ष उल्हास मणचेकर ,भाजपा तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर ,माजी सभापती,रवींद्र जोगल,माजी पंचायत समिती सदस्य अजित कांबळे, माजी पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य वर्षा पवार व अन्य उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)