एस. टी महामंडळाकडून माजी सैनिकांवर झालेल्या अन्यायाविरोधात वाचा फोडण्यासाठी माजी सैनिक नागोजी परशुराम खरात यांचे आज एकदिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू.
कोळोशी येथील नागोजी खरात (माजी सैनिक) यांना गेली १६ वर्षे वेतन निश्चितिचा फरक न मिळाल्याने २८ जुलैला त्यांचा वाहतूक नियंत्रक कणकवली कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण .
शिरगांव/संतोष साळसकर :
कणकवली तालुक्यातील कोळोशी येथील नागोजी परशुराम खरात यांना एस टी महामंडळाने गेले १५ ते १६ वर्षे राहिलेली वेतन निश्चिती बाबत पाठपुरावा करूनही त्यांना अद्याप ती मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी गुरू. दि. २८ जुलैला विभाग नियंत्रक कणकवली कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला बसणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
त्यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात असे नमूद केले आहे की,मी गेली १५ ते १६ वर्षे माझी राहिलेली वेतन निश्चिती बाबत संबधित विभागाकडे लेखी व तोंडी स्वरूपात प्रत्यक्ष भेटून पाठपुरावा करीत होतो. तसेच ३१ मे २०२२ रोजी मी सेवानिवृत्त झालो.त्यावेळी मला संबधित विभाग नियंत्रक,कर्मचारी वर्ग अधिकारी, लेखा अधिकारी यांनी आश्वासन दिले की तुमची वेतन निश्चिती केली असून ७ जून २०२२ च्या पगारात त्याचा संपूर्ण फरक दिला जाईल. परंतु मला अद्याप वेतन निश्चिती चा फरक दिला गेला नाही.त्यामुळे माझी घोर फसवणूक झाली आहे.तरी मला आपण ५/०६/२००४ नुसार वेतन निश्चिती करून न दिल्यास आपणा विरुद्ध गुरू. दि. २८ जुलैला आपल्या कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला बसणार असल्याचा इशारा प्रसिध्दी पत्रकात नमूद केला आहे. याच्या माहितीसाठी प्रती तहसीलदार कणकवली,पोलीस निरीक्षक कणकवली, राज्य परिवहन महामंडळ सिंधुदुर्ग विभागाचे सुरक्षा व दक्षता अधिकारी, कामगार अधिकारी यांना दिले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)