ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
गावाच्या ज्ञान विकासात वाचनालयांचे योगदान हे महत्वपूर्ण : सौ.अर्चना घारे.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

गावाच्या ज्ञान विकासात वाचनालयांचे योगदान हे महत्वपूर्ण : सौ.अर्चना घारे.

प्रकाशन: 25 Jul 2022 12:30 PM
वाचन संख्या 51

बांदा |राकेश परब :
गावाच्या ज्ञान विकासात वाचनालयांचे योगदान हे महत्वपूर्ण असते. येथील शतक रौप्यमहोत्सव वर्ष साजरा करत आलेले नट वाचनालय विद्यार्थी व वाचनप्रेमी नागरिक यांची नावीन्यपूर्ण उपक्रमातून साहित्याची भूख भागवत आहे हे कौतुकास्पद आहे. असे गौरवोदगार अर्चना फौंडेशनच्या अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांनी येथे काढले. यावेळी वाचनालयाच्या विस्तारित सभागृहासाठी राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांच्या खासदार निधीतून १० लाख रुपये मिळवून देण्याचे आश्वासन सौ. घारे-परब यांनी दिले.
माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त येथील नट वाचनालयाला करियर गाईन्डन्स च्या पुस्तकांचा संच भेट देण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात घारे परब बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर वाचनालायचे अध्यक्ष एस आर सावंत, उपाध्यक्ष सुभाष मोर्ये, सचिव राकेश केसरकर, सहसचिव हेमंत मोर्ये, संचालक सुधीर साटेलकर, निलेश मोरजकर, संचालिका स्वप्नीता सावंत, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, रत्नागिरी पक्ष निरीक्षक सौ दर्शना बाबर-देसाई, प्रशांत गवस, ग्रंथपाल प्रमिला नाईक-मोरजकर, सुनील नातू, अमिता परब आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स