ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सहज ट्रस्ट या संस्थेतर्फे 'चला, थोडं मोकळं होऊया' कार्यक्रम.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सहज ट्रस्ट या संस्थेतर्फे 'चला, थोडं मोकळं होऊया' कार्यक्रम.

प्रकाशन: 25 Jul 2022 10:35 AM
वाचन संख्या 25

बांदा | राकेश परब :
येथील सहज ट्रस्ट या संस्थेतर्फे ‘चला, थोडं मोकळं होऊया’ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित शालेय व खुला गटात विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘आनंदी मी’ या विषयावर स्वानुभव लेखन स्पर्धा (जास्तीत जास्त ७०० शब्द), ‘आनंदी मी’ या विषयावर कविता लेखन स्पर्धा (जास्तीत जास्त २० ओळी), ‘आनंदी मी’ या विषयावर चित्र स्पर्धा (A 4 आकाराच्या कागदावर चित्र), ‘आनंदी मी’ या विषयावर व्हिडिओ स्वरूपात स्वगत स्पर्धा (जास्तीत जास्त ५ मिनिटे) असे विषय ठेवण्यात आले आहेत. सर्व स्पर्धांसाठी इयत्ता ५ वी ते ७ वी, इयत्ता ८ वी ते १२ वी, १८ ते २५ वर्षे व २५ वर्षांपुढील असे गट ठेवण्यात आले आहेत.
स्पर्धेच्या नियमानुसार स्वानुभव लेखन आणि कविता कागदाच्या एकाच बाजूवर लिहिलेले असावे. स्वानुभव लेखन, कविता लेखन यांच्या खाली आणि चित्राच्या मागच्या बाजूला खालील माहिती द्यावी. अन्यथा साहित्य स्वीकारले जाणार नाही. व्हिडिओच्या सुरूवातीला खालील माहिती सांगावी. त्याची वेळ व्हिडिओच्या वेळेत धरण्यात येणार नाही. प्रत्यक्ष स्वागत सुरूवात केल्यापासून व्हिडिओची वेळ धरण्यात येईल. स्पर्धकाचे नाव, संपूर्ण पत्ता (पिनकोड सह), जन्मदिनांक, वय, गट क्रमांक, संपर्क क्रमांक, स्पर्धकाची स्वाक्षरी, शाळेचे/कॉलेजचे नाव (केवळ पहिल्या तीन गटांना लागू), वर्गशिक्षक/मुख्याध्यापकांची स्वाक्षरी (केवळ पहिल्या दोन गटांना लागू). साहित्य किंवा व्हिडिओ पाठवण्याचा अंतिम दिनांक ३० ऑगस्ट २०२२ आहे. स्पर्धेचे बक्षीस वितरण १० ऑक्टोबरच्या जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या कार्यक्रमात करण्यात येईल. स्पर्धेसाठी व्हिडिओ मो. 9420880529 या व्हाट्सअँप क्रमांकावर पाठवावा. लेखन साहित्य सहज ट्रस्ट, मन्नत बंगला, करोल वाडा, जुना बाजार, सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग
पिन : ४१६५१० या पत्त्यावर पाठवावे. शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांचे, पालक – शिक्षकांचे साहित्य एकत्रित गोळा करून सामूहिक स्वरूपात एकाच लिफाफ्यातून पाठवू शकतात. अधिक माहितीसाठी मीनाक्षी मो. 9420880529 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 90
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स