झेडपी पंचायत समिती मधील आरक्षण सोडत गुरुवारी.
इच्छुकांमधील धाकधुक वाढली आरक्षणाकडे लागले लक्ष .
ओरोस | प्रतिनिधी :
जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या निवडणुकांची तयारी देखील अंतिम टप्प्यात येऊन ओबीसी आरक्षणामुळे रद्द झालेली आरक्षण ची सोडत आता गुरुवारी 28 जुलैला होणार आहे यापूर्वी बुधवारी 13 जुलैला होणाऱ्या आरक्षण सोडतील राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिली होती सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण रद्द केले होते याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या 55 गट आणि 110 गणांची रचना होऊन ओबीसी वगळता इतर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निश्चित झाला होता मात्र आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात 13 जुलै रोजी होणारी आरक्षण सोडत रद्द करण्यात आली होती मात्र http://localhost/news/public/uploads/20 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण देण्याचा निर्णय दिला त्यामुळे आता होणाऱ्या निवडणुका ओबीसी आरक्षणा नुसार होणार आहेत त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे यानुसार जिल्हाधिकारी मंगळवारी 26 जुलै रोजी आरक्षण सोडते ची अधिसूचना जाहीर करतील त्यानंतर गुरुवारी 28 प्रत्यक्ष आरक्षणाची सोडत होणार आहे जिल्हा परिषद गटासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर आरक्षणाची सोडत होईल तर पंचायत समिती गणांसाठी तहसीलदारांच्या पातळीवर आरक्षण सोडत होणार आहे दि. 5ऑगस्ट रोजी अंतिम आरक्षण जाहीर होणार आहे
त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मधील इच्छुकामध्ये धाकधूक वाढली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)