सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विठ्ठल मंदिर बांदा व सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान यांच्या वतीने बांद्यात महारक्तदान शिबिर.
बांदा | राकेश परब :
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विठ्ठल मंदिर बांदा व सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक २९ ला महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे हे तिसरे वर्ष असून दरवर्षी १५० हुन अधिक रक्त पिशव्याचे संकलन करण्यात येते.
येथील विठ्ठल रखुमाई मंगल कार्यालयात सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत शिबीर संपन्न्न होणार आहे. पडवे येथील एसएसपीएम मेडिकल कॉलेज व गोवा मेडिकल कॉलेज (जीएमसी बांबोळी) या दोन रक्तपेढ्या रक्त संकलन करणार आहेत. अधिक माहितीसाठी मो. ९०७५८५७५५८ किंवा मो. ९०७५०६५१५२ यांच्याशी संपर्क साधण्याचे तसेच जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन गणेशोत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न.
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव...