ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
सिंधुकन्या पूर्वा गावडे राष्ट्रीय वाॅटर पोलो स्पर्धेत सिल्वर मेडलची मानकरी.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

सिंधुकन्या पूर्वा गावडे राष्ट्रीय वाॅटर पोलो स्पर्धेत सिल्वर मेडलची मानकरी.

प्रकाशन: 22 Jul 2022 10:51 AM
वाचन संख्या 56

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंटः
भुवनेश्वर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय वॉटर पोलो स्पर्धेत सिंधुदुर्गची कन्या कु. पूर्वा संदीप गावडे हिने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना उत्कृष्ठ कामगिरी करत सिल्व्हर मेडल पटकावले आहे. राष्ट्रीय स्पर्धेत प्रथमच निवड होऊन पहिल्याच प्रयत्नात सिल्व्हर मेडल मिळविल्याबद्दल पूर्वाचे आणि महाराष्ट्र संघाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी विशेष अभिनंदन केले असून, संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हावासीयांसाठी अभिमानास्पद बाब असल्याचे म्हटले आहे.

स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया मार्फत ओडिशा-भुवनेश्वर येथे 16 ते http://localhost/news/public/uploads/20 जुलै या कालावधीत राष्ट्रीय वॉटर पोलो स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या मुलींच्या संघाने अतिशय दमदार कामगिरी करत दिल्ली, आसाम, कर्नाटक व पश्चिम बंगालच्या संघाना पराभूत करत सलग चार सामने जिंकून अंतिम फेरीत धडक मारली होती. केरळ संघा विरुद्ध झालेल्या अंतिम सांमन्यात उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्र संघाला सिल्व्हर मेडल मिळाले आहे.
वॉटर पोलो स्पर्धेत महाराष्ट्र संघाच्या मुख्य 7 जणांच्या टीम मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याची कन्या पूर्वा गावडे हिने स्थान मिळविले होते. राष्ट्रीय स्पर्धेत पहिल्यांदाच तिची निवड झाली होती. या संधीच सोने करत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना उत्कृष्ट कामगिरी केली. सलग चार सामन्यात संघाला विजय मिळवून देण्यात मोठे योगदान दिले. संघ निवडीसाठी राष्ट्रीय निवड प्रशिक्षक म्हणून निळकंठ आखाडे, तसेच योगेश निर्मळ व संजीवनी वानखेडे वॉटर पोलोचे प्रशिक्षक याचे मार्गदर्शन लाभले.
सिंधुदुर्गनगरी-ओरोस गावची कन्या असलेली पूर्वा पाच वर्षांची असल्यापासून सिंधुदुर्गनगरी येथील जलतरण तलावा जलातरणचा सराव करत होती. तिला प्रशिक्षक प्रवीण सुलोकार याचे चागले मार्गदर्शन लाभले तिची आई रश्मी गावडे हिनेही भरपूर मेहनत घेतली. त्यामुळे तालुका, जिल्हा स्तरावर तिने चमकदार कामगिरी केल्यानंतर सातवी मध्ये असताना तिची पुणे बालेवाडी येथील क्रीडा प्रबोधिनी मध्ये राष्ट्रीय जलतरण प्रशिक्षणासाठी निवड झाल. गेली तीन वर्षे ती प्रशिक्षण घेत आहे व त्याच ठिकाणी शिक्षण चालू आहे. यावर्षी ती दहावी शिकत आहे. बालेवाडी येथे बालाजी केंद्रे यांच्याकडून उत्कृष्ट जलतरण प्रशिक्षण मिळत असल्याने तिची वॉटर पोलोच्या महाराष्ट्र संघात निवड होऊन तिने राष्ट्रीय स्तरावरील सिल्व्हर मेडल मिळविले आहे. या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण
संघटनेचे सचिव आदित्य सांगवेकर यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स