ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
बॅ. नाथ पै सेवांगण मालवण येथे योग शिबिराचे आयोजन..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

बॅ. नाथ पै सेवांगण मालवण येथे योग शिबिराचे आयोजन..!

प्रकाशन: 21 Jul 2022 10:46 PM
वाचन संख्या 62

विवेक परब |एडिटोरिअल असिस्टंट :
बॅ.नाथ पै सेवांगण, मालवण व सिंधुदुर्ग महिला योग समिती पतंजली योग समितीच्या संयुक्त विद्यमाने 3 ते 7 ऑगस्ट पर्यंत पाच दिवशीय योग शिबिराचे आयोजन बॅ. नाथ पै सेवांगण मालवण येथे करण्यात आले आहे. 3 तारीखला उद्घाटन सोहळा संध्याकाळी 5 ते 5.30 व 5.30 ते 7 यावेळेत योग शिबिर तसेच 4 ते 6 आँगस्टला सकाळी 6 ते 8 व संध्याकाळी 5 ते 7 अशा दोन सत्रात तसेच 7 तारीखला संध्याकाळी 5 ते 7 वाजता शिबिर होऊन त्याच दिवशी समारोप सोहळा होणार आहे.
आज या संदर्भात सिंधुदुर्ग महिला पतंजली योग समिती सिंधुदुर्ग यांनी ऑनलाईन सभा घेतली. यावेळी सभेला सहराज्य प्रभारी रमाताई जोग, जिल्हा प्रभारी नर्मदा पटेल, जिल्हा महामंत्री रश्मी अंगणे, जिल्हा कोषाध्यक्ष तृप्ती तोरस्कर, जिल्हा संघटन मंत्री दिपश्री खाडिलकर, जिल्हा संघटनमंत्री प्रणाली मराठे, जिल्हा युवती प्रभारी श्वेता गावडे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष वर्षा गावकर, संपर्क प्रमुख व तहसील प्रभारी वर्षाराणी अभ्यंकर मालवण, संपर्क प्रमुख प्रियाताई कोचरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. आपल्या जीवनाला निरोगी व सर्वांग सुंदर ठेवण्यासाठी तसेच योगाचा प्रचार व प्रसार व्हावा व ह्या राष्ट्रधर्म कार्या विषयी जनजागृती होऊन संपूर्ण समाज आरोग्य संपन्न व्हावा हा या शिबिरामागचा मूळ उद्देश आहे. या शिबिराला बालक, युवक, युवती, महिला, पुरुष तसेच सर्व वयोगटातील साधकानी याचा लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी तहसील प्रभारी
सौ.वर्षाराणी बलवंत अभ्यंकर-९४०३५६२६५२, ऋतुजा केळकर-९४२०४२३७९०, अर्चना हर्डीकर-९४२०२१०७५९ यांच्या संपर्क साधण्याचे आवाहन या समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स