ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>२१ व्या शतकातील युवकांचे सर्वात मोठे सामर्थ्य असेल तर ते कौशल्य - बाबा काणेकर.</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>२१ व्या शतकातील युवकांचे सर्वात मोठे सामर्थ्य असेल तर ते कौशल्य - बाबा काणेकर.</em>

प्रकाशन: 19 Jul 2022 01:53 PM
वाचन संख्या 53

व्ही.एन.नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीअम स्कूल मध्ये जागतिक कौशल्य दिन साजरा…!

बांदा | राकेश परब :
कौशल्य म्हणजे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले स्कील, २१ व्या शतकातील युवकांचे सर्वात मोठे सामर्थ्य म्हणजे कौशल्य आहे. कौशल्य आत्मसात करण्याची क्षमता ही स्वतःला मिळालेली एक देणगी आहे.

ज्यामध्ये अनुभवामुळे वाढ होत जाते असे मत बाबा काणेकर यांनी जागतिक कौशल्य दिनाच्या कार्यक्रम बोलताना व्यक्त केले. बोलताना पुढे म्हणाले कौशल्य हा असा खजिना आहे जो कोणीही तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. कौशल्य म्हणजे आत्मनिर्भरता आहे. कौशल्य मुलांना रोजगार बनवत नाही तर स्वयंरोजगारक्षम बनवते. कौशल्य सामर्थ्य माणसाला उंच शिखरापर्यंत घेऊन जाऊ शकते. दहा वर्षांपूर्वी मी स्वतः पाच वर्षे नोकरी केल्यानंतर माझ्या असे लक्षात आले की नोकरीमध्ये न राहता स्वतःच्या कौशल्याने एखादा उद्योग व्यवसाय सुरू करावा आणि याच उद्देशाने मी आज गेली दहा वर्ष उद्योजक म्हणून काम करत आहे. उद्योजक बनवण्यासाठी व आपलं नाव मिळवण्यासाठी शिक्षणाची कोणती अट नसून स्वतःच्या कौशल्यावर आपण मोठे होऊ शकतो. आज विविध इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी विविध कौशल्याच्या जोरावर वेगवेगळे प्रकल्प तयार करत आहेत. आपल्या प्रशाळेमध्ये एम.एस.एफ.सी. सारखा कोर्स सुरू असून या कोर्सच्या माध्यमातून तुमच्या स्वतःच्या बुद्धीने तुमच्या हाताच्या सामर्थ्याने कौशल्याच्या माध्यमातून तुम्ही स्वतःला समृद्ध करू शकता. त्याचबरोबर देशाचीसुद्धा प्रगती करण्यास तुमचा हातभार लावू शकता असे बोलताना सांगितले.


यावेळी व्यासपीठावर उद्योजक बाबा काणेकर, उद्योजक नारायण पित्रे, उद्योजक भाऊ वळंजु, उद्योजक सिद्धेश पावसकर, प्रशाळेच्या मुख्याध्यापीका सौ.मनाली देसाई एम. एस. एफ. सी. विभाग प्रमुख सौ. रीना मोरजकर उपस्थित होते.
आपल्या प्रशाळेमध्ये एम.एस. एफ. सी. सारखा विषय एक कौशल्य विषय असून मुलांना याचा भविष्यात मोठा फायदा होणार आहे. आजचे जग हे तंत्रज्ञान युगातील जग असल्यामुळे दहावीनंतर शिक्षण घेऊन बाहेर गेलेल्या मुलांना इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश घेताना या विषयाचा मोठा उपयोग होत आहे.तसेच हा विषय सरासरी गुणांसाठी खूप चांगला असून विद्यार्थ्यांनी या विषयाकडे पूर्ण लक्ष द्यावे असे मत माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. श्वैता कोरगावकर यांनी आजच्या जागतिक कौशल्य दिनाच्या कार्यक्रमांमध्ये बोलताना सांगितले.
भविष्यामध्ये विद्यार्थी स्वयंरोजगारामध्ये पुढे यावेत स्वतःचा उद्योग व्यवसाय त्यांनी चालू करावा. विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य आजमावून एखाद्या उद्योगांमध्ये पुढे यावे याचा विचार करून इयत्ता आठवी ते दहावी मधील मुलांना राष्ट्रीय शिक्षा अभियानाच्या माध्यमातून आपल्या देशाचे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा विषय शालेय स्तरावर शिकवण्यासाठी अभियान सुरू केले. खरोखरच विद्यार्थ्यांसाठी हे अभियान खूपच उपयुक्त आहे असे युवा उद्योजक श्री सिद्धेश पावसकर यांनी आजच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. प्रशाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई यांनी आजच्या जागतिक युवा कौशल्य दिनाच्या कार्यक्रमात कौशल्य दिनाच्या मुला विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत कौशल्य विषयी सविस्तर माहिती दिली.
जागतिक युवा कौशल्य दिनाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेती विभागाच्या निदेशिका सौ. गायत्री देसाई यांनी केले. तर उपस्थित मान्यवरांचे स्वागत निदेशक भिकाजी गिरप ,सौ.रिया देसाई,सौ.गायत्री देसाई यांनी केले. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कुमारी मुक्ता कामत हिने कौशल्य दिना विषयी आपले मनोगत व्यक्त केले. सकाळी विद्यार्थ्यांनी व्ही.एन.नाबर शाळा ते बांदेश्वर मंदिर पर्यंत कौशल्य दिनानिमित्त प्रभात फेरी काढली. तसेच यानिमित्ताने शाळेमध्ये पोस्टर स्पर्धा व घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये इयत्ता आठवी मध्ये प्रथम क्रमांक कुमारी श्रीशा सावंत, नववी प्रथम क्रमांक सायमा आगा, दहावी प्रथम क्रमांक कुमार दत्ताराम सावंत यांना देण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक राकेश परब तर कार्यक्रमाचे आभार गुह आरोग्य विभागाच्या निदेशिका सौ. रिया देसाई यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 453

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स