शिरगांव येथील पुंडलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालयाला "वस्त्रहरण"कार ज्येष्ठ मालवणी लेखक गंगाराम गवाणकर यांची भेट.
कुडाळ येथे होणाऱ्या युथ फेस्टीव्हल साठी गंगाराम गवाणकर यांनी प्रा. शेखर गवस यांच्या आग्रहाखातर लिहिली मालवणी एकांकिका.
शिरगांव/संतोष साळसकर :
देवगड तालुक्यातील शिरगांव येथील पुंडलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालयात “वस्त्रहरण”कार ज्येष्ठ मालवणी लेखक. गंगाराम गवाणकर यांनी नुकतीच भेट दिली. या महाविद्यालयाच्या कुडाळ येथे होणाऱ्या युथ फेस्टीव्हल साठी त्यांनी स्वतः लिहिलेल्या मालवणी एकांकीकेच्या संहितेचे पूजन आणि वाचन केले. तसेच मुलांच्या ऑडिशनही घेतल्या.
या महाविद्यालयाचे प्रा. शेखर गवस हे या मालवणी एकांकिकेचे दिग्दर्शन करणार असून त्यांच्या खास आग्रहाखातर स्वतः गंगाराम गवाणकर यांनी या मालवणी एकांकीकेचे लेखन केले. आणि या एकांकिका संहितेचे शिरगांव वरिष्ठ महाविद्यालयात पूजन करून वाचन केले. तसेच यावेळी या एकांकिकेमध्ये भाग घेणाऱ्या मुलांची ऑडिशन ही घेतली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष संभाजी साटम,वरिष्ठ महाविद्यालयाचे मुख्यध्यापक ध्वजेंद्र मिराशी, गणपत तावडे, सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक दिलीप पाळेकर, सचिन देसाई,माधव साटम आदींसह इतर पदाधिकारी,प्राध्यापक,विद्यार्थी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)