ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>वसुलीची कार्यतत्परता कामातही दाखवा ;अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा.</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>वसुलीची कार्यतत्परता कामातही दाखवा ;अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा.</em>

प्रकाशन: 17 Jul 2022 11:55 AM
वाचन संख्या 43

बांद्यात संतप्त नागरिकांचा घेराव…!

बांदा | राकेश परब :
बांदा शहरात गेले महिनाभर वीजेचा खेळखंडोबा सुरु असल्याने संतप्त नागरिकांनी शुक्रवारी सकाळी सहाय्यक अभियंता एस. आर. कोहळे यांना घेराव घालत जाब विचारला. ग्राहकांच्या एकाही प्रश्नाचे समर्पक उत्तर देण्यात अभियंता कोहळे अपयशी ठरले. येत्या आठ दिवसात सर्व समस्यांचे निराकरण न झाल्यास कार्यालयाला टाळे ठोकू. प्रसंगी गुन्हे दाखल झाले तरीही चालतील असा गर्भित इशारा देण्यात आला. वीज बीले वसुलीची कार्यतत्परता कामातही दाखवा असेही सुनावण्यात आले.
बांदा शहरात वीजेची गंभीर समस्या आहे. वारंवार वीज खंडीत होत असल्याने ग्राहक पुरते हैराण झाले आहेत. व्यापार्‍यांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. लेखी निवेदने देऊनही महावितरणच्या कार्यपद्धतीमध्ये काहीच फरक पडलेला नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी अभियंता कोहळे यांना घेराव घातला.
जीर्ण वीज वाहिन्या व खांब, वाहिन्यांवरील झुडपांची सफाई न करणे यामुळे वीज खंडीत होण्याचे प्रकार वाढले आहेत. वीज बीले वसुलीची कामे करण्यात कर्मचारी तत्परता दाखवितात. मात्र वीजेच्या समस्या सोडविण्यात मात्र मागे असतात असा आरोप ग्रा. पं. सदस्य साई काणेकर यांनी केला. शहरापासून दीड कि. मी. अंतरावर महावितरणचे कार्यालय असल्याने ग्रामीण भागातील ग्राहकांना फटका बसत आहे. सदर कार्यालय शहरातच असले पाहिजे अशी मागणी सदस्य जावेद खतीब यांनी केली.
यावेळी अधीक्षक अभियंता, सावंतवाडी उप अभियंता यांच्याशी संपर्क केला असता त्यांचे मोबाईल स्वीच ऑफ आल्याने ग्राहक आणखीनच संतप्त झाले. यावेळी अभियंता अनिल यादव उपस्थित नसल्याने सरमळे येथून आलेल्या ज्येष्ठ ग्राहकांना हात हलवित माघारी परतावे लागले. येत्या ८ दिवसात वीजेची परिस्थिती न सुधारल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला. ग्राहकांच्या प्रश्नांवर अभियंता कोहळे निरुत्तर झाले होते. विनेश गवस यांनी वाफोलीतील वीज समस्या व वायरमनचा बेजबाबदारपणा याबाबत तक्रार केली.
यावेळी सरपंच अक्रम खान, सदस्य जावेद खतीब, साई काणेकर, बाळू सावंत, शाम मांजरेकर, ज्ञानेश्वर सावंत, विनेश गवस, निखील मयेकर, निलेश देसाई, समीर सातार्डेकर, केदार कणबर्गी, नाना सावंत, प्रज्योत काणेकर, ओंकार नाडकर्णी, सचिन वीर, प्रथमेश गोवेकर, बिपीन येडवे, हेमंत दाभोलकर, प्रविण येडवे, अर्णव स्वार आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 90
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स