टिळक महाराष्ट्र विद्यापीठ केंद्र गोवा येथे प्रवेश प्रक्रियेला सुरुवात...!
विवेक परब/एडिटोरिअल असिस्टंट : प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील गोवा व महाराष्ट्रातील कोकण प्रांत रत्नागिरी पर्यंत या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय व्हावी म्हणून टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिकृत गोवा केंद्रावर संस्कृत कोविद इयत्ता ११वी ते संस्कृत पारंगत एम् ए व भारतीय विद्या पारंगत इंडोलॉजी या विषयांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे.
या शिक्षणासाठी वयाची कोणतीही अट नसून कोणत्याही वयोगटातील व्यक्ती प्रवेश घेऊ शकते.
तसेच शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील युजीसी च्या नियमानुसार या संधीचा लाभ घेता येतो.
इच्छुक विद्यार्थ्यांनी गोमंतक संस्कृतोत्तेजक मंडळ संचालित शांकर पाठशाळा कवळे फोंडा गोवा या संस्थेच्या कार्यालयात संपर्क साधावा व आपला प्रवेश निश्चित करावा. असे आवाहन शांकर पाठशाळेचे प्राचार्य श्री. महेश श्रीप्रकाश कापडी संपर्क (७०४०६४६५३०) यांनी केले आहे…..
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)