ताज्या बातम्या
कांदळगावात आमदार निलेश राणे यांच्या विकासकामांच्या झंझावाताने प्रेरित होत अनेकांचा शिवसेना पक्षप्रवेश. पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या उपोषणाला महाविकास आघाडीचा पाठिंबा. परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा १ नोव्हेंबर रोजी १४ वा पुण्यस्मरण दिन सोहळा. केरळच्या मुलींची महाराष्ट्रावर मात तर तेलंगणाचा उत्तर प्रदेशवर अतिरिक्त वेळेत निसटता विजय. पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...!
अविनाश पराडकर यांची लोकसभा सोशल मीडिया अध्यक्षपदी निवड….!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

अविनाश पराडकर यांची लोकसभा सोशल मीडिया अध्यक्षपदी निवड….!

प्रकाशन: 16 Jul 2022 10:52 PM
वाचन संख्या 39

महाराष्ट्र प्रभारी आशिष शेलार यांनी केली घोषणा.

विवेक परब / एडिटोरिअल असिस्टंट :

भारतीय जनता पक्षाने संपूर्ण देशभरात लोकसभेची निवडणूक जिंकण्यासाठी मजबूत मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पक्षाच्या केंद्रीय यंत्रणेच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात “मिशन १४४” राबवले जात आहे. लोकसभा प्रवास योजना अभियानांतर्गत ओरोस येथे भाजपा नेते तथा महाराष्ट्र प्रभारी असलेल्या आमदार आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आज ओरोस येथे सिंधुदुर्ग जिल्ह्याची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आमदार आशिष शेलार यांनी अविनाश पराडकर यांची लोकसभेच्या मुख्य संयोजकपदी नियुक्ती घोषित केली.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. लोकसभा प्रवास योजना अभियान यशस्वीपणे राबवण्याच्या दृष्टीने दोन्ही जिल्ह्यातील एकूण सहा विधानसभेत सोशल मीडियाची प्रभावी यंत्रणा राबवण्याची जबाबदारी अविनाश पराडकर यांच्यावर सोपवली आहे. यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष म्हणून पराडकर यांची कामगिरी अतिशय प्रभावी राहीली असून भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्यपदी त्यांची निवड करण्यात आली होती. लोकसभेची ही विशेष जबाबदारी अविनाश पराडकर यशस्वीपणे पेलतील असा विश्वास पक्षवर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी आमदार आशिष शेलार यांच्यासह जिल्हाध्यक्ष राजन तेली, आमदार नितेश राणे, महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रमोद जठार, लोकसभा संयोजक अतुल काळसेकर, रणजित देसाई, महिला जिल्हाध्यक्षा सौ संध्या तेरसे, प्रभाकर सावंत, भाई सावंत, राजू राऊळ आदी पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा १ नोव्हेंबर रोजी १४ वा पुण्यस्मरण दिन सोहळा.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा १ नोव्हेंबर रोजी १४ वा पुण्यस्मरण दिन सोहळा.

परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा १...

30 Oct 2026 220

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स