यशस्विनी प्रतिष्ठानकडून शिक्षकांचा सन्मान..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हायस्कुल आणि कै. वीणा सुरेश बांदेकर ज्यू. कॉलेज ऑफ व्होकेशनल कोर्सेसचा बारावीचा निकाल शंभर टक्के लागल्या बद्दल यशस्विनी प्रतिष्ठान कडून सर्व शिक्षकांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या यशस्विनी प्रतिष्ठान चे अध्यक्ष आनंद मालाडकर यांचे प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापिका श्रीमती मोनिका कुंज यांनी आभार मानले.
यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती मोनिका कुंज, संगीतरत्न राजेंद्र प्रभू, हिंदळे येथील प्रसिद्ध भजनीबुवा विजय परब, मृदुंग वादक शैलेश सावंत, प्रसाद बागवे,एन जि वीरकर, हरीश महाले, सौ गौरी तवटे, सौ. रश्मी कुमठेकर, प्रणय महाजन, गुरुप्रसाद मांजरेकर, सौ मिताली हिर्लेकर, सौ प्रियांका ठाकूर, प्रियांका कासले, स्वप्नील कांदळगावकर आदी उपस्थित होते. गुरुवर्य राजेंद्र प्रभू व भजनीबुवा विजय परब, शैलेश सावंत यांचा प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन व आभार प्रसाद बागवे यांनी मानले.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)