ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
मसुरे येथे समर्थ बागवे महाराज मठामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मसुरे येथे समर्थ बागवे महाराज मठामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न.

प्रकाशन: 13 Jul 2022 04:31 PM
वाचन संख्या 57

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :

मसुरे देऊळवाडा दत्तवाडी येथील श्री समर्थ बागवे महाराज यांच्या मठामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव भाविक भक्तगणांचा उपस्थितीत मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
मसुरे दत्तवाडी येथील श्री समर्थ बागवे महाराज मठामध्ये गुरुपौर्णिमे निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ वाजता समर्थांची ब्राम्हणांकरवी विधिवत पूजा अर्चा, दुधाभिषेक, जलाभिषेक, दत्तगुरुंची आरती तदनंतर उपस्थित भाविकांनी तीर्थप्रसादाचा लाभ घेतला.
रात्रौ श्रींची आरती आणि स्थानिकांचे सामूहिक भजन असे कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमांचा लाभ दशक्रोशीतील तसेच देवगड व मालवण तालुक्यातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येनं उपस्थीत राहून घेतला.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स