केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेत बदल
सुधारित वेळ लवकरच जाहीर करू – राजन तेली
कणकवली / उमेश परब – जन आशीर्वाद यात्रेत काल घडलेल्या अनुचित प्रकारामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेच्या नियोजित कार्यक्रमात थोडासा बदल करण्यात आला आहे. ही यात्रा येत्या दोन दिवसात त्याच उत्साहात आणि ठरलेल्या मार्गावरून सुरू होणार आहे, अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली. यात्रेचा सुधारित कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येणार आहे असे तेली यांनी सांगितले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)