<em>पूरस्थिती, नैसर्गिक आपत्ती, तसेच रोग, महामारी यातून संकट निवारण होण्यासाठी श्री बांदेश्वर मंदिरात लघुरुद्र…!</em>
बांदा | राकेश परब :
बांदा शहरातील नागरिकांचे पूरस्थिती, नैसर्गिक आपत्ती, तसेच रोग, महामारी यातून रक्षण व्हावे तसेच बांदा वासिय जनतेला सुख, समाधान व निरोगी दीर्घायुष्य लाभावे यासाठी बांदा ग्रामपंचायतीच्या वतीने येथील जागृत श्री बांदेश्वर मंदिरात ब्राम्हणांच्या उपस्थितीत लघुरुद्र करण्यात आला. यावेळी श्री बांदेश्वर व भूमिका मंदिरात गाव कल्याणसाठी सार्वजनिक गाऱ्हाणे घालण्यात आले.
पावसाळ्यात बांदा शहराला नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका बसतो. गतवर्षी तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी शहरात शिरून कोट्यावधी रुपयांची हानी झाली होती. त्यामुळे यावर्षी नैसर्गिक तसेच जैविक आपत्ती बांदा शहरावर उद्भवू नये यासाठी या लघुरुद्राचे आयोजन करण्यात आल्याचे सरपंच अक्रम खान यांनी यावेळी सांगितले.
यावेळी तलाठी वर्षा नाडकर्णी, तंटामुक्ती अध्यक्ष गुरुनाथ सावंत, ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, साई काणेकर, शामसुंदर मांजरेकर, सदस्या किशोरी बांदेकर, रिया आलमेडा, स्वप्नाली पवार, अंकिता देसाई, हर्षा सावंत-पटेकर व्यापारी संघांचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, ज्येष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष अन्वर खान, किशोर बांदेकर, सुनील सावंत, महादेव वसकर, तुळशीदास धामापूरकर, सुनील धामापूरकर, संजय सावंत, अरुण देसाई, संतोष तारी आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)