<em>वृक्षवल्ली आम्हा सोयरे…!</em>
नाथ गोसावी युवक मंडळ चिंदर सडेवाडीने ६५२ वृक्ष लागवड करुन केली आषाढी एकादशी साजरी.
विवेक परब/ एडिटोरिअल असिस्टंट: परमेश्वर चराचरात भरला आहे असे म्हणतात. अनेक ठिकाणी बेसुमार वृक्ष तोड होत आहे. झाडे लावा झाडे जगवा अशा वल्गना केल्या जातात प्रत्यक्षात मात्र काहीच होत नाही. मात्र सिंधुदुर्ग जिल्हातील चिंदर- सडेवाडी येथील “नाथ गोसावी युवक मंडळाने”. बांबू रोपे, आंबा, फणस, रतांबा, काजू, वड, पिंपळ, अशोक, नारळ, पोफळ, अननस अशा प्रकारची ६५२ झाडे लावून अनोख्या पध्दतीने आषाढी एकादशी साजरी केली.
झाडे लावण्यासाठी युवकां बरोबर वृद्ध, महिला, बालक यांचाही समावेश होता. गेली दोन वर्षे मंडळ आपल्या सार्वजनिक जागेत अशा प्रकारची लागवड करत आहेत. तसेच युवकांना रोजगार प्राप्तीसाठी नवनवीन उपक्रम राबवत आहेत.
या उपक्रमात मंडळाचे अध्यक्ष योगेश गोसावी, मुंबई महापालिका मुख्य लेखापाल पांडुरंग गोसावी, संतोष गोसावी, हेमंत गोसावी हे खास मुंबई वरुन येतात.
मोरेश्वर गोसावी, चेतन गोसावी, स्वप्नील गोसावी, मंगेश गोसावी, रोशन गोसावी, रवींद्र गोसावी, किरण सावंत, संतोषबुवा गोसावी, रविंद्र गोसावी, जयेश गोसावी, रोशन गोसावी, शुभम गोसावी, संंतोषबुवा गोसावी, दिपक गोसावी, कृष्णनाथ गोसावी, सोनू गोसावी, सुनिल गोसावी, प्रतिक मुळये, बबन सावंत, किरण सावंत यांच्या सह महिलाही सहभागी होत्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)