दिल…जिगर…जिरगे..!
मालवण | सुयोग पंडित (संपादकीय विशेष) : आजचा दिवस गाजला तो संपूर्ण ‘मालवण नगरपरिषद ब्रेकिंगने!’
माजी खासदार आणि भाजप नेते डाॅ निलेश राणे यांनी मालवण नगरपरिषदेत दाखल होत मुख्याधिकारी व प्रशासकीय यंत्रणांना विचारलेला जाब व दिलेले इशारे…!
हा विषय थोडा राजकीय आहे..थोडे शासकीय व थोडा प्रशासकीय.
माध्यम म्हणून तो येणार्या काळावर सोडताना काही मुद्दे खूप छान अधोरेखीत होतात.
पहिला मुद्दा की प्रशासकीय कालावधीत ‘कामे झालीत…म्हणून कामे चुकली..!’
दुसरा मुद्दा. आजकाल पालक एम.पि.एस.सी.किंवा शासकीय स्पर्धा वगैरेसाठी मुलांना विनाकारण लेक्चर वगैरे सहन लावतात ..पण आपल्याच समोर एक असा प्रशासकीय एम.पि.एस.सी मुख्याधिकारी असतो जो संपूर्ण ताकतीने आलेले विरोधक व त्यांचे धमकीचे वादळ केवळ शासकीय सेवा म्हणून शांतपणे आपल्या खुर्चीवर बसून शांतपणे विश्लेषीत करतो.
आज नगरपरिषदेत जाऊन अक्षरशः प्रशासनाचे वाभाडे काढायचा प्रयत्न झाला….नगरपरिषद पर्यटन महोत्सव जल्लोष http://localhost/news/public/uploads/2022 वरुनही अतिशय “खालच्या” स्तराची टीका त्याने सहन केली…आणि प्रशासकीय इच्छाशक्ती वगैरेही त्याच्या शिकवण्या घेतल्या गेल्या.
सामान्य मालवणवासीय आजही पुन्हा दांडीवर गेला….हसला….चैतन्यदायी झाला. त्याला आठवलं की हो..एखादा जबाबदार प्रशासकीय अधिकारीही सामान्य बनून रॅम्पवर चालू शकतो…आनंदात सहभागी होऊन नाचू शकतो.
त्यासाठी त्याला राजकारणी झुलपं पांघरावी लागत नाहीत आणि हांजी तर करावीच लागत नाहीत.
एक गंमत सांगतो..लवकरच चॅनेलवर आपण तो व्हिडिओ अपलोड करतोय.
मालवणची गटारं तुंबली तो ठेकेदेर वगैरे खरंच लापर्वा…बेदरकार आहेच..
पण त्या तुंबलेल्या गटारातून बिअरच्या बाटल्या,निरोधची पाकिटे, प्लास्टीकच्या बाटल्या व पिशव्या,सॅनिटरी नॅपकीन व इतर वस्तू टाकणारे गुन्हेगार मालवण नगरपरिषद प्रशासन आहे का?
संधी आम्ही दिली..
खापर त्यांच्यावर फुटलं.
पण इतकं विनम्र रहायला जिगर लागते..संतोष जिरगेंसारखी.
आपलं पाल्य जर प्रशासकीय व नम्र बनावं तर संतोष जिरगेसारखं …असं वाटणं हा प्रशासकीय स्पर्धा परीक्षांचा हेतू असेल..!
नाहीतर …..उठ सूठ…टीकेची सूट आहेच.
मालवण नगरपरिषद माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर…माजी नगरसेवक यतीन खोत व मंदार केणी आणि इतर जे इतक्या इच्छाशक्ती असलेल्या मुख्याधिकारी व व टीमला अभय देत होते त्यांच्यावर उदयापासून आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल मिडिया ट्रायल करेलच
सुयोग.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)