<em>वायंगणीतील विकास कामांसाठी माजी उपसरपंच हनुमंत प्रभू यांनी दिले निवेदन….!</em>
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
मालवण तालुक्यातील वायंगणी गावातील विविध विकास कामांबाबत वायंगणी गावचे माजी उपसरपंच श्री हनुमंत प्रभू यांनी निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. मालवण भाजपा तालुकाध्यक्ष श्री धोंडी चिंदरकर यांजकडे लेखी निवेदनाद्वारे प्रभू यांनी सदर मागणी केली आहे. सदरची कामे किती महत्वाची आहेत याची पाहणी आपण प्रत्यक्ष संबंधित अधिकारी यांना सोबत घेऊन करावी अशी विनंती या अर्जाद्वारे केली आहे. सुचवीलेल्या विकास कामांमध्ये वायंगणी भंडारवाडी रस्त्यावरील पाटवाडी ओढ्यावर कॉजवे बांधणे, वायंगणी बौद्धवाडी येथील ओढ्यावरील मोरीची उंची वाढवीणे, वायंगणी भंडारवाडी रस्त्याचे डांबरीकरण करणे, वायंगणी भंडारवाडी दांडवळ येथील खोतांच्या घराकडे जाणारा रस्ता तयार करणे, वायंगणी आसोलकर दुकान ते पाटवाडी रस्त्यावरील साइडपटी तुटली आहे ती दुरुस्त करणे, वायंगणी सडयेवाडीवर विद्युत पुरवठा कमी दाबाने होतो तो सुरळीत करणे, वायंगणी सडयेवाडी येथे मेनरोड ते ब्राम्हणदेव मंदिर 100 मीटर रस्ता नवीन तयार करणे, वायंगणी स्वामी समर्थ मठ ते धामणेवाडी रस्ता डांबरीकरण करणे आदी विकास कामांचा समावेश आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)