<em>आषाढी एकादशी निमित्त पळसंब वरचीवाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन….!</em>
कणकवली | प्रसन्ना पुजारे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील पळसंब वरची वाडी येथे आषाढी एकादशी निमित्त उद्या श्री विठ्ठल रखुमाई देवालयामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
सकाळी ८.०० वाजता नित्यपुजा ,सकाळी ८.३० वाजता मूर्तीवर अभिषेक , सकाळी ९.०० वाजता शासकीय पुजा श्री.राजेंद्र पराडकर (उप मुख्य कार्यकारी अधिकारी ) सिंधुदुर्ग जिल्हा (प्रभारी आयुक्त),दुपारी ११.०० वाजता कृषी विषयक मार्गदर्शन शिबीर ,सायंकाळी 3.00 वाजता भजने व दिंडी कार्यक्रम अशी सोहळ्यातील कार्यक्रमांची रुपरेषा आहे.
तरी या प्रसंगी आयोजित केलेल्या सोहळ्यातील कार्यक्रमांना सर्व भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी विनंती श्री विठ्ठल रखुमाई देवालय ट्रस्ट, पळसंब वरचीवाडी यांच्या वतीने करण्यात आली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)