ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
उंडील नं १ शाळेतील मुलांनी अनुभवला एक दिवस बळीराजा सोबत…!

उंडील नं १ शाळेतील मुलांनी अनुभवला एक दिवस बळीराजा सोबत…!

प्रकाशन: 09 Jul 2022 11:02 AM
वाचन संख्या 66

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
मुलांना लहान वयातच शेती बाबत आवड निर्माण व्हावी या द्रुष्टीने शिक्षण विभागा तर्फे प्राथमिक स्तरावर एक दिवस बळीराजा सोबत उपक्रम राबविला जात आहे. शुक्रवारी पुर्ण प्राथमिक शाळा उंडील नं १ शाळेच्या वतीने या उपक्रमांतर्गत मुलांनी शेतावर जात बळीराजा सोबत शेतावर राबत भात लावणीचा आनंदही घेतला. या उपक्रमात उंडील सरपंच जयेश नर, तलाठी सुनीता मेस्त्री, पोलीस पाटील जयवंती नर यांनी ही भाग घेत भात लावणीचा आनंद घेतला.

उंडील येथील शेतकरी जगन्नाथ नर यांच्या शेतावर जाऊन सर्व मुलांनी तरवा काढून मुलांनी व शिक्षकांनी भात लावणीचा आनंद घेतला. आधुनिक शेती व पारंपरिक शेती याविषयी ची माहिती ग्रामसेविका मती पेडणेकर यांनी मुलांना दिली, रासायनिक खतांचा कसा वापर करावा याचे मार्गदर्शन मुंडे सर यांनी केले, शेती ही काळजी गरज ही संकल्पना मुख्याध्यापक . नर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केलं, सावंत सर यांनी आधुनिक ट्रॅक्टरचा वापरून करून कशी मशागत केली जाते हे सागितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स