<em>नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेबाबत चुकीचे रहिवाशी दाखले दिले तर परिणाम गंभीर : माजी खासदार डाॅ.निलेश राणे.</em>
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
नवोदय विद्यालयाच्या प्रवेश पूर्व परीक्षेस बसलेल्या बाहेरील विद्यार्थ्यांना खोटे रहिवासी दाखले जिल्ह्यात चुकीच्या पद्धतीने दिले गेले तर संबंधिताना तीव्र रोषास सामोरे जावे लागेल. भारतीय जनता पक्षांने यापूर्वी संबंधित विषयासाठी आंदोलन सुद्धा छेडले होते. काही शाळांनी चुकीची प्रवेश पद्धती अवलंबून इथल्या स्थानिक विद्यार्थ्यांवर अन्याय केला परिणामी आज जिल्ह्यातील फक्त ३५% च मुले सिलेक्ट झाली आणि स्थानिक ६५% विद्यार्थ्यांवर अन्याय झाला ही बाब अतिशय संताप जनक असून संबंधितानी याची नोंद घ्यावी आपण आजच पालकांच्या तक्रारी आल्यावर तहसीलदार मालवण यांच्याशी चर्चा केली असून तहसीलदार यांनी तसे तात्काळ लक्ष घालतो असे सांगितले आहेच. परंतु हा विषयी आपण जिल्हाधिकारी यांच्यासुद्धा कानावर घालणार असून जर कोणी चुकीच्या पद्धतीने असे दाखले देत असतील तर संबंधितावर कारवाई व्हावी असे डाॅ. निलेश राणे यांनी सांगितले.
यावेळी तक्रारदार पालक-रोशन दळवी, दिगंबर कदम, संजय पाताडे, संदिप कदम,राजेंद्र नाईक तसेच भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, विजय केनवडेकर,तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, दादा नाईक, बाबा परब, विक्रांत नाईक, संतोष गांवकर आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)